२६ जानेवारी – भारतीय प्रजासत्ताक दिवस | 26 January – Indian Republic Day Marathi Nibandh

२६ जानेवारी – भारतीय प्रजासत्ताक दिवस | 26 January – Indian Republic Day Marathi Nibandh

26 January – Indian Republic Day: भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण आहे. भारताची राज्यघटना, संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली गेली होती. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने तसेच उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतात. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’.

हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालय, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजतुन कवायती, भाषणे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल, लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेत्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला.

दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्यानवीन योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासी मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतात.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा २६ जानेवारी – भारतीय प्रजासत्ताक दिवस (26 January Indian Republic Day Marathi Nibandh) आवडला असेल.

लक्ष द्या: जर तुमच्या कडे सुद्धा 26 January Indian Republic Day वर अशाच प्रकारे कोणता Marathi Essay असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा 26 January Indian Republic Day Marathi Nibandh आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment

x