आधार जिवाला वाटावा | Aadhar Jeevala Vatava Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले
चित्रपट – काका मला वाचवा
वय तर माझे सोळा सत्रा
स्वभाव अगदी भोळा भित्रा
आधार जिवाला वाटावा
असा कुणी मज भेटावा..
जो येतो तो भंवती फिरतो
सौंदर्याचे कौतुक करतो
हा त्रास जयाने निपटावा
असा कुणी मज भेटावा..
कुणी म्हणे मज गुलाब हसरा
कुणी म्हणे मज गुणी शर्करा
अभिमान जयापुढे फिकटावा
असा कुणी मज भेटावा..
ब्रह्मचारी मज देतो टॉफी
गृहस्थ पाजितो काळी कॉफी
पण संसार जयासी थाटवा
असा कुणी मज भेटावा..
एकोणिस वा वीस वयाचा
मलाच राहील वचक जयाचा
मन-पतंग त्याने काटावा
असा कुणी मज भेटावा..