आदिमाया अंबाबाई | Aadimaya Ambabai Marathi Lyrics
गीत – सुधीर मोघे
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – थोरली जाऊ
Aadimaya Ambabai Marathi Lyrics
आदिमाया अंबाबाई, सार्या दुनियेची आई
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई
उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई
हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई
सार्या चराचरीं तीच जीवा संजीवनी देते
तीच संहारप्रहरीं दैत्य-दानव मारीते
उग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई
क्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी उभे राहिले मंदिर
नाना देव ते भोवती देवी मधोमध राही
तुळजापूरीची भवानी जणु मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी
स्वत: तरली, भक्तांना स्वयें तारुनिया नेई
अमरावतीची देवता शाश्वत, अमर
अंबेजोगाईत तिने एक मांडियले घर
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई
कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी
दुर्गा दुर्घट यमाई, अंबा असुरमर्दिनी
किती रूपें, किती नावें परि तेज एक वाहीं