आईपण दे रे | Aaipan De Re Marathi Lyrics

आईपण दे रे | Aaipan De Re Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – कृष्णा कल्ले
चित्रपट – जिव्हाळा


आईपण दे रे, देवा, नवस किती करू ?
फूल वेलीला येऊ दे, एक होऊ दे लेकरू

वांझपणाचं औक्ष असून नसून सारखं
बाळावाचुनिया घर सर्व सुखाला पारखं

बाळा अंगीच्या धुळीनं ज्यांची मळतात अंगं
त्यांच्या होऊन दुनियेत कोण भाग्यवंत सांग ?

Leave a Comment

x