आमच्या गावची जत्रा | Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh । Jatra Essay in marathi

आमच्या गावची जत्रा | Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh

Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh: विद्यार्थीमित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत आमच्या गावची जत्रा मराठी निबंध. तर चला मग आजच्या लेखाला सुरवात करूया.

मित्रांनो पुण्यापासून जवळच मुळशी तालुक्यातील मुठा हे माझे मूळ गाव.  आमच्या गावची जत्रा म्हटलं कि जसा एक वेगळाच उत्साह सर्वांच्या मनात असतो तसाच उत्साह आणि एक आनंद माझ्या मनात असतो. कधी एकदा गावच्या जत्रेचा दिवस उजाडतो आणि कधी मी गावाला सर्व भावंडांसोबत जातेय असे मला वाटते. गावच्या जत्रेला जाताना आम्ही सर्व भावंडे आणि मामा-मामी, आजी-आजोबा, मावशी-काका, असे सगळे एकत्र गावाला जातो. गावी जाण्याआधी आम्ही सर्व भावंडे आनंदात असल्यामुळे सर्व तयारी करण्यास घरातील मोठया माणसांना मदत करतो. आमची सुद्धा तयारी आम्ही जाण्याआधी दोन दिवस आधीच करण्यास सुरुवात करतो.

आम्ही भावंडे पिण्याचे पाणीसुद्धा गावाला नेतो कारण आम्हाला गावाकडचे विहिरीचे पाणी आवडत नाही. आम्ही एसटी किंवा चारचाकी गाडीने गावाला जातो. फार फार वर्षांपूर्वी आमच्या गावी बैलगाडीने जावे लागायचे कारण त्यावेळी जाण्यासाठी काही साधन नव्हते आणि रस्ता सुद्धा खूप लहान व खराब होता, असे आमचे आजी-आजोबा सांगतात.

पण आता आमच्या गावाला जायला इतरही छोट्या मोठ्या वाहनांची सोय झाली आहे. तसेच आमच्या गावापासून थोड्याच अंतरावर लवासा सिटी झाली आहे. त्यामुळे रस्तेसुद्धा खूप सुधारले आहेत आणि गावातसुद्धा खूप प्रगती झाली आहे. पूर्वी आमच्या गावामध्ये दोन-तीनच दुकाने होती पण आता गावात भरपूर दुकाने आणि बँक सुद्धा झाली आहे. गावामध्ये पोहोचल्यानंतर सर्व नातेवाईक खूप दिवसांनी भेटतात आणि कसे आहात याची चौकशी करतात. गावात सर्वांच्याच घरी जत्रेसाठी भरपूर पाहुणे पुण्यातून तसेच इतर शहरातून आलेले असतात.जत्रेच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना भेटतात त्यामुळे एक आपुलकीची भावना सर्वांच्याच मनात निर्माण होते आणि विचारांची देवाण-घेवाण सुद्धा होते.

Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh
Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh

गावाची जत्रा ही विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये भरते. त्यामुळे सर्व गावकरी मिळून जत्रेच्या आधी मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करतात. तसेच मंदिर सुद्धा खूप स्वच्छ करतात. त्याचबरोबर गावातील सर्वच मंदिरांमध्ये त्यादिवशी साफसफाई केली जाते. विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर जत्रेच्या दिवशी रंगबेरंगी फुलांनी सजवतात. त्यानंतर गावातील सर्व मंदिरांमध्ये मनोभावे पूजा,आरती करतात आणि नैवेद्य दाखवतात. सर्वांच्याच घरी त्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो.

गावच्या जत्रेच्या पहिल्या दिवशी देवाची पालखी संपूर्ण गावात फिरते. सर्वजण मनोभावे नमस्कार करतात हार-फूले वाहतात आणि देवाचा भंडारा उधळतात. देवाची ही पालखी ढोल, लेझीम, ताशा अशा वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावात फिरते. त्यावेळी लहान मुलांची खूप मजा असते तेव्हा आम्ही सर्व भावंडे खेळतो आणि भंडाऱ्यामध्ये नाचतो. तसेच पालखीसोबत संपूर्ण गावात फिरतो.

तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर पालखी विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवली जाते. जत्रेच्या दिवशी मंदिराच्या परिसरामध्ये खूप गर्दी असते. खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने आणि इतर गृहपयोगी वस्तू असे सर्व काही जत्रेत विकायला असते. सर्व घरातील मोठी माणसे आम्हाला सगळ्या भावंडांना खरेदी करण्यासाठी पैसे देतात. मग आम्ही सर्व भावंडे आणि मामा-मामी,मावशी-काका या मोठ्या माणसांसोबत जत्रेमध्ये जातो.

पहिल्यांदा आम्ही सर्व मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो त्यानंतर आम्ही जत्रेत खरेदीसाठी जातो. आम्ही जत्रेत खेळणी, दागिने, लहान भावंडांसाठी फुगे आणि मिठाई खरेदी करतो. त्यानंतर आम्ही आकाश पाळण्यामध्ये बसतो. आमच्या गावामध्ये जत्रेच्या वेळी कुस्ती स्पर्धा सुद्धा असतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराजवळच कुस्ती आखाडा आहे तिथे या कुस्ती स्पर्धा असतात. आमचे गाव संपूर्ण  मुळशी तालुक्यामध्ये कुस्तीगीरांसाठी प्रसिद्ध आहे.

मित्रांनो तुम्हाला जर का असेल मराठी निबंध वाचायचे असतील तर तुम्ही आमचा अँप देखील डाउनलोड करू शकता

मराठी निबंध अँप

जत्रेमध्ये नाच गाण्यांचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला असतो. त्यावेळी जत्रेत खूप गर्दी पाहायला मिळते. त्यानंतर आम्ही खूप आनंदात घरी जातो कारण आमच्या मनासारखी खरेदी झालेली असते. खरेतर जत्रेतून घरी जावेसेच वाटत नाही कारण जत्रेतील ते मस्त वातावरण शहरामध्ये अनुभवायला मिळत नाही. त्यानंतर आम्ही सर्वजण घरी अंगणात एकत्र बसून जेवण करतो आणि उशीरपर्यंत अंगणात गप्पा मारतो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पुण्याला यायचे असते. आजी-आजोबा गावाकडील जुन्या लोकांच्या गमती जमती सांगतात आणि आम्ही त्यांना शहरातील आमच्या गप्पा गोष्टी सांगतो. गप्पांमध्ये वेळ कसा जातो ते कळतच नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला येतो. गावाकडून निघताना आमचे भावंडांचे पायच निघत नाहीत पण काय करणार शाळेसाठी यावेच लागते.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा आमच्या गावची जत्रा (Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh) आवडला असेल.

लक्ष द्या: जर तुमच्या कडे सुद्धा Aamchya Gavchi Jatra Essay in Marathi वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Mi pahilela jatra marathi nibandh

हे देखील वाचा

Maza Avadta Sant Essay in Marathi

Me Shikshak Zalo Tar Marathi Nibandh

The Beginner’s Guide to Writing an Essay

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “आमच्या गावची जत्रा | Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh । Jatra Essay in marathi”

Leave a Comment