30+ Akbar Birbal story in Marathi | Marathi Goshti Akbar Birbal 2024

Table of Contents

Akbar Birbal story in Marathi | Marathi Goshti Akbar Birbal | Akbar Birbal Marathi Goshti 2024

Akbar Birbal story in marathi: मित्रांनो जेव्हा जेव्हा बुद्धिमत्ता, हुशारपणा आणि चातुर्याची चर्चा होते तेव्हा प्रथम नाव आपल्या समोर येते ते म्हणजे बिरबलाचे. अकबर आणि बिरबल यांची जुगलबंडी कोणापासून लपलेली नाही. असेही म्हटले जाते की बिरबल हा सम्राट अकबरच्या नावरत्नांपैकी एक मौल्यवान रत्न मानला जात असे. अकबर-बिरबलशी संबंधित बर्‍याच कथा आहेत ज्या आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात तसेच Akbar birbal marathi katha या प्रेयणादायी देखील असतात. म्हणूनच आम्ही आजच्या या लेखामध्ये तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Akbar Birbal Stories in Marathi. 

रबलाने आपल्या हुशारीने आणि त्याच्या बुद्धिमत्तेने सम्राट अकबराच्या दरबारातील अनेक गुंतलेली प्रकरणे वेळो वेळी सोडवली होती. आणि कित्तेकदा तर स्वतः अकबराने देखील बिरबलाला कोड्यात टाकून त्यांची बुद्धिमत्तेची चाचणी घेतली होती. तस पहिले गेले तर या सर्व गोष्टी खूप जुन्या आहेत पण आजकालच्या मुलांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवायचे असेल तर या गोष्टींचे महत्व खूप जास्त आहे. तर चला मग पाहूया Akbar Birbal Short Story In Marathi

बिरबलाची खिचडी | Famous Akbar-Birbal Stories In Marathi 2024

Famous Akbar Birbal khichdi story in Marathi
Famous Akbar Birbal khichdi story in Marathi

त्या दिवसात खूप जास्त थंडीचे दिवस चालू होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक वेगळीच घोषणा केली. त्यांनी दवंडी पिटवली कि  राजवाड्या समोरच्या जलकुंडात रात्रभर जर कुणी उभा राहिल्यास त्याला १०० सुवर्ण मुद्रा देण्यात येतील.  ती दवंडी ऐकून एक अतिशय गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो. ठरल्याप्रमाणे तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते.

अकबर विचारतो, हा दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक म्हणतो होय. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणार्‍या माणसास उब मिळाली असेल असा अनुमान अकबर काढतो.आणि १०० सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो. तो ‍गरीब माणूस बिचारा खूप दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, ‘तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.’

दुसर्‍या दिवशी दरबार भरतो. रोज अगदी वेळेवर येणारा बिरबल आज आलाच नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक बिरबलाकडे जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. बिरबल खिचडी शिजल्यानंतरच येणार असल्याने, राजा दरबाराच्या कामास सुरवात करतो. दुपार झाल्यावरही बिरबल न आल्याने राजा सेवकाला पुन्हा पाठवितो. दूसरा सेवकही बिरबलाची खिचडी झालीच नसल्याचे सांगतो.

अकबराला आश्चर्य वाटते. दरबार संपतो तरी बिरबल येत नाही म्हणून अकबरच बिरबलाच्या घरी जाईल निघतो. तेथे गेल्यानंतर पाहतो तर  काय. बिरबलाने छोटी चूल पेटवून बर्‍याच उंचीवर एका मडक्यात खिचडी शिजायला ठेवलेली असते. अकबर हसतो आणि म्हणतो, अरे बिरबल तू एवढा हुशार आणि चतुर. मग तुला एवढे समजत नाही, की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर ती कशी तापेल?

तेव्हा बिरबल म्हणतो, ‘क्षमा असावी महाराज, दूरच्या दिव्याची उब घेऊन एखादा माणूस जर रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो, मग याच न्यायाने खिचडी शिजायला काय हरकत आहे?

अकबराला लगेच त्याची चूक लक्षात येते. मग रात्रभर पाण्यात उभा राहणारया माणसाला तो तातडीने बोलावणे पाठवून शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देतो. मग तो गरीब माणूस समजतो कि बिरबलानेच काही तरी युक्ती केली असावी मग तो माणूस अकबराकडे बघून स्मितहास्य करतो आणि १०० मोहरांचे बक्षीस घेऊन हसत हसत निघून जातो.


बिरबल काळा कसा झाला | Birbal Kala Kasa Jhala 2024

Most Popular Akbar-Birbal Stories In Marathi
Most Popular Akbar-Birbal Stories In Marathi

एक दिवस अकबराच्या दरबारात माणसाची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा चालू होती.

बरेच लोक कुरूप माणसांच्या कुरूपतेचे स्मरण करूनच हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे, दरबारात आगमन झाले. त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलला दरबारातील दरबाऱ्यांचे आकस्मात हसण्याचे कारण विचारावेसे वाटत होते परंतु काही विचार करून तो गप्प राहीला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व थोडयाचे वेळात बिरबलला संधी मिळाली तेव्हा त्याने अकबरला विचारले, ‘महाराज! आपण सर्वजण हसतमुख का दिसत आहात?’

अकबर बोलला, ‘लोकांच्या हसण्याचे कारण तुझी कुरूपता आहे, त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत परंतु बिरबल काळा कसा झाला.’

बिरबल बोलला, ‘ महाराज मला खेद वाटतो की, अजूनपर्यंत याचे कारण कोणालाही समजले नाही.’ अकबर बादशहा बोलला, सांगितल्या शिवाय लोकांना कसे समजणार. जर तुला तुझ्या कुरूपतेचे कारण माहीती असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्यांच्या मनातील भ्रम लगेच दूर कर.

बिरबलने उत्तर दिले, ‘महाराज ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीचा निर्माणाला सुरूवात केली तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवांच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली. तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना सर्व प्रथम रूप, दुसर धन, तिसरे बुध्दी, आणि चौथे बल प्रदान केले.

चारही गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती. मी बुध्दी घेण्यात गुंतून गेलो आणि जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेली होती त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो. मी फक्त बुध्दीच घेऊन आलो आणि तुम्ही सगळे मात्र धन , रूप आणि बल या गोष्टीनी समृद्ध झालात. याच कारणामुळे मी कुरूप राहिलो.

बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबर व त्याच्या दरबारातील दरबाऱ्यांची माने खालावली आणि या नंतर मात्र त्या लोकांनी बिरबलचाच नव्हे तर इतर कोणाही कुरूप व्यक्तीचा कधीच मजाक केली नाही.


विचित्र परीक्षा | Vichitra Pariksha Akbar Birbal Moral story in Marathi

Vichitra Pariksha Akbar Birbal Moral story in Marathi
Vichitra Pariksha Akbar Birbal Moral story in Marathi

त्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर अकबराला आपल्या दरबाऱ्यांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. अकबराने आपल्या सरदारांना मांजरीची गोजिरवाणी पिल्ल दिली. ते म्हणाले आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्ल घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल.

प्रत्येक सरदार आपलयाला मिळालेल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसांना त्यांनी बादशाहाने ठेवलेल्या बक्षीसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला, अशी सरदाराने घरातल्या माणसांना सूचनाच दिली.

प्रत्येक सरदाराच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला. हळू हळू मांजरांच्या अंगावर तेज येऊ लागल. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र आपल्या बिरबलाने आपल्याला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढववील. उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले.

अकबर बादशहाने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आप-आपली मांजर दरबारात आणायला सांगितली. प्रत्येक जण आपआपली मांजर घेऊन दरबारात पोहचले. अकबराने सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला “बिरबल सर्व सरदारांची मांजर बघ कशी गुबगुबीत दिसत आहे आणि तुझे मांजर का असेल हडकुळे?”.

बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला, “खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या.” उंदीर पकडणे हे मांजराचे महत्वाचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. अकबराने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने दोन तीन उंदीर मारले देखील. इतर गलेलठ्ठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारी नव्हती.

बादशहाने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिल.

Best Short Moral Stories In Marathi


अकबर बादशहा आणि पोपट | Akbar badshaha aani Popat -Akbar Birbal Gosthi

Akbar badshaha aani Popat
Akbar badshaha aani Popat

एकदा, एक गरीब माणूस अकबराच्या राजदरबाराला भेट देतो. त्याने त्याच्याबरोबर एक सुंदर पोपट आणलेला असतो व तो महाराजांपुढे ते पोपट सादर करतो. महाराजांना तो पोपट खूप आवडला. अकबर तो पोपट आपल्याकडे ठेवून घेतो व त्या माणसाला योग्य ते बक्षिस देऊन दरबारातून जायला सांगतो.

अकबर तो पोपट एका नोकराकडे देतो व म्हणतो. ‘या पोपटाची व्यवस्थित काळजी घे व त्याला वेळोवेळी खाऊ घाल व त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. तो आजारी आहे किंवा मेला आहे अशा प्रकारची कोणतीही बातमी घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. जर तू अशी वाईट बातमी माझ्याकडे घेऊन आलास तर मी तुझे डोके धडापासून कापून वेगळे करेल.’

तो नोकर पोपटाची खरोखरच नीट काळजी घेत असे.

तरीसुध्दा,एके दिवशी तो पोपट आजारी न पडता मेला. हे बघून तो नोकर खूप घाबरला त्याने मनातल्या मनात विचार केली की, ‘जर मी हे सांगायला महाराजांकडे गेलो तर, त्याचवेळी माझा मृत्यू निच्छीत आहे जर मी आत्ता याबद्दल कळविले नाही तरीसुध्दा काही दिवसांनी महाराजांना हे समजेल व माझी शिक्षा ही मृत्यूच असेल. मी आता काय करू?’

त्याला काहीही कळत नव्हते की आता काय करावे मग तो नोकर बिरबलाकडे गेला व त्याला सर्व काही सांगितले.

बिरबल त्याला म्हणाला काही काळजी करू नको मी स्वतः अकबर बादशहांशी बोलतो.

‘महाराज तुमचा पोपट…..’ बिरबलने त्याचे वाक्य पूर्ण करण्याच्या आतच.

‘माझा पोपट!’ अकबर बोलला ‘काय झाले त्याच्याबरोबर?’

‘विशेष असे काही नाही महाराज! परंतु तो….’

‘मला एकदा सांग, बिरबल’ अकबर उतावीळपणे बोलला, ‘तो मेला आहे का?’

‘नाही..नाही.. महाराज. तुमचा पोपट तर मोठया संन्यासीमध्ये परिवर्तित झाला, त्याचे आकाशाकडे तोंड आहे व तो डोळे बंद करून पाठीवर झोपला आहे.’

‘मग तू का सांगत नाही, की पोपट मेला आहे म्हणून?’ अकबर बिरबलवर ओरडत म्हणाला.

‘जर तुम्हाला असे बोलणे आवडत असेल तर. तुम्ही बोलू शकता महाराज पण मी कसे बोलू शकतो?’ बिरबल बोलला. ‘कारण मला असे वाटते की तो प्रार्थना करीत आहे.’

‘चल जाऊया आणि त्याला बघूया.’ अकबर बोलला.

बिरबलने पोपटाचा पिंजरा दाखवला. अकबरने बघितले की पोपट मेला आहे.

‘बिरबल तू तर खूप बुध्दीमान आहेस’ अकबर बोलला.

‘परंतु मला तुला बघून आश्चर्य वाटते की तू जिंवत आणि मृत पोपट यांमध्ये फरक ओळखायला सक्षम नाही.

पोपट मेला आहे असे तु मला आधी का सांगितले नाही.’

‘मी असे कसे बोलू शकतो महाराज?’ बिरबल बोलला. ‘तुमचा पोपट मेला आहे असे मी जर तुम्हाला बोललो असतो तर तुम्ही माझे डोके धडापासून वेगळे केले असते.’

आता अकबरला त्याचे शब्द आठवले. पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी नोकरावर सोपवल्यानंतर तो बोलला होता की ‘जर तू माझ्याकडे पोपट मेला आहे अशी बातमी घेऊन आला तर मी तुझे डोके धडापासून वेगळे करेल.’

अकबरने स्मित हास्य केले.

‘अरे बिरबल, तू तर खरोखरच बुध्दीमान आहेस!’ अकबर बोलला.


एकदा दिल्ली दरबारामध्ये बादशाह आणि बिरबल सहज गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता बादशाहने एक प्रश्न बिरबलाला विचारले. त्याने विचारलं, बिरबल या जगात दर 100 डोळस माणसांच्या मागे एक आंधळा आहे असे म्हणतात ते कितपत खर आहे? बिरबलने एक क्षण विचार केला आणि त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं. खाविंद खरे तर हे चुकीचे आहे. या जगात डोळे असलेल्या लोकांपेक्षा अंधांची संख्या जास्त आहे.

बिरबलाचं हे उत्तर ऐकून. बादशाहला आश्चर्य वाटले आणि तो तुम्हाला? अरे असं कसं म्हणतोस तू? आपल्याला लक्षात येत नाही का? दिसणाऱ्यांची संख्या आंधळापेक्षा नेहमी जास्त असते.

आणि बिरबल म्हणाला. खाविंद, एक दिवशी मी तुम्हाला प्रयोग करून हे पटवून दाखवेन.

त्या दिवशी तो विषय तिथेच संपला. तीन चार दिवसांनी दिल्लीतल्या चांदणी चौकातल्या अगदी भर रहदारीच्या रस्त्यावर बिरबल अगदी मध्यभागी. खाटेची एक रिकामी चौकट आणि सुतांच्या दोन गुंड्या घेऊन बसतो. आणि उभ्या आडव्या अशा दोरखंडांनी ती खाट विणायायला लागला आणि आपल्या दोन बाजूना त्यांनी दोन मुनीमांना वही आणि लेखणी घेऊन बसवले. त्या चौकात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला बिरबल काय करतोय असं कुतूहल जागृत झाले. जो तो येऊन बिरबलाचा उद्योग पाहायला लागला.

त्यापैकी एकानं विचारलं. काय बिरबलजी, आज हे काय चाललय? बिरबलाने त्याला काही उत्तर दिलं नाही आणि त्यांनी आपल्या उजव्या बाजूला असलेल्या मुनिमाला सांगितलं यांचे नाव तू आंधळ्यांच्या यादीत नोंदव. दुसरा एक जण आला. त्याने विचारले बिरबलजी हे काय करताय? त्याने पुन्हा उजवीकडच्या मुनिमाला सांगितलं. हा यांचेही नाव आंधळ्यांच्या यादीत नोंदवा.

त्यानंतर अजून एक तिसरा आला. आणि त्यांनी विचारलं. बिरबल जी आज तुम्ही खाट विणताय आणि तेसुद्धा भरलेल्या भरचौकात. हा प्रश्न ऐकून बिरबलाने त्याच्या डावीकडच्या असणाऱ्या मुनिमाला सांगितलं. हा यांचे नाव डोळस व्यक्तींच्या यांदीद नोंदवा. पुन्हा कुणीतरी आला आणि त्याने विचारलं, बिरबल जी, आज घाट का विणताय? यावर बिरबलाने आपल्या डावीकडच्या मुनिमाला सांगितलं हा, यांचाही नाव डोळसांच्या यादीत नोंदवा अशा रीतीने दिवसभर लोक येऊन बिरबलाला प्रश्न विचारत होते आणि बिरबल त्यांचा विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे त्यांचं नाव डोळसांच्या किंवा आंधळ्यांच्या यादीत घालत होता.

काहीच वेळात हि बातमी बादशाहपर्यंत पोहचते आणि बादशाह स्वतः बिरबलाचा काय उद्योग त्यांनी आरंभला केला आहे पाहण्यासाठी चांदणी चौकात गेला. तिकडे जातो आणि पाहतो तर काय? बिरबल काही तरी विणत बसला होता. अकबर बादशाहाने बिरबलाला विचारले. अरे बिरबल अरे हे तुझ भर चौकात काय चालू आहे? बिरबल काहीही न बोलता ताबोडतोब आपल्या उजवीकडच्या मुनिमाला सांगितलं. हा, बादशाहांचे नाव देखील आपल्या राज्यातील आंधळ्या लोकांच्या यादीत टाका.

हे ऐकून मात्र बादशाह रागावला आणि ते म्हणाले. अरे बिरबल माझे दोन्ही डोळे व्यवस्थित शाबूत असताना माझं नाव आंधळ्यांचे यादीत का टाकलेस?

त्यावर बिरबर हसत हसत बादशहाला म्हणाला. खाविंद मी काय करता आहे ते स्पष्ट दिसत असताना तुम्ही मला बिरबल काय चाललंय असं विचारलं? म्हणजे हा प्रश्न आंधळ्या माणसासारखं नाहीये का? आणि म्हणूनच मी तुमचेही नाव मी आंधळ्यांच्या यादीत घातले. हे ऐकल्यानंतर बादशाहला काय सगळा प्रकार चालू आहे तो लक्षात आला आणि त्यांनी हसत बिरबलाला विचारलं. हां हां ….. अच्छा अच्छा म्हणजे त्या दिवशीचा आपल्या बोलण्यावर तुम्हाला सप्रयोग सिद्ध करायला हे सगळे उद्योग आरंभले असं दिसतंय.

मग काय निर्णय काय झाला तुझा. खाविंद, सकाळपासून या याद्या आज आम्ही दोन तयार केले आहेत. त्यामध्ये गमतीची गोष्ट अशी की 75 टक्के लोक आंधळ्यांच्या यादीत आहेत आणि 25 टक्के लोक फक्त डोळसांच्या यादीत आहेत. बघा तुम्हाला पटलं ना मी काय म्हटलं होतं की जगह डोळ्यांच्यापेक्षा जास्ती असतात. बादशाह बिरबल चातुर्यावर खुश झाला आणि तो फक्त एवढेच म्हणाला. बिरबल तू तुझ म्हणणे समजवायला काहीही करशील


बादशहा झक मारत आहे | Badshaha Zak Marat aahe Akbar birbal Marathi Katha

Badshaha Zak Marat aahe Akbar birbal Marathi Katha
Badshaha Zak Marat aahe Akbar birbal Marathi Katha

 एके दिवशी अकबर आणि बिरबल फिरत होते व फिरता फिरता नदी काठी पोचले. नदी काठी काही मच्छीमार हे मासे मारत होते. त्यांना मासे मारतांना बघून अकबरला पण मासे मारण्याचा मोह झाला. व त्यानेही मासे मारण्यास सुरूवात केली. काही कारणा निमित्त बिरबलला राणीकडे निरोप घेऊन जावे लागले. तेथे पोहचल्यावर राणीने राजांच्या खुशाली बद्दल विचारले की, बादशहा कुठे आहेत?

बिरबलने तात्काळ उत्तर दिले, ‘झक मारत आहेत.’

राणी या उत्तराने खूप नाराज झाली व जेव्हा बादशहा अकबर महालात आले तेव्हा बिरबलने केलेल्या कृत्याची गोष्ट कथन केली आणि बिरबलला शिक्षा देण्याची विनंती केली. आपल्या प्रती बिरबलचे असे अपशब्द ऐकून बादशहा क्रोधीत व रागाने लाल झाला. यावर राणीने महाराजांना टोमणा मारला, बिरबलला खूप डोक्यावर चढवले आहे याचे फळ हेच असणार आहे.

राणीच्या या बोलण्याने बादशहा आणखी चिडला. बादशहाने त्याचवेळी शिपायांना आज्ञा दिली की बिरबलला ताबोडतोब बोलवून आणा. आज्ञा मिळताच शिपाई बिरबलला घेऊन आले. बिरबल येताच अकबर बादशाह क्रोधीत होऊन बोलला, ‘आज तू राणीला काय सांगितले? तुझे डोके जास्तच चालते आहे.’

बिरबलने नम्रपणे सांगितले मी तर फक्त हे सांगितले होते की, ‘बादशहा झक मारत आहे. याचे कारण असे आहे की आपल्या संस्कृत भाषेत माश्याला झक म्हणतात. यामुळे मी असे बोललो. जर माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करावी.’

बिरबलचे उत्तर ऐकून अकबर बादशहाचा राग शांत झाला व राणीही आनंदी झाली.


कोंबडीचे अंडे | Kombadiche Ande Akbar Birbal Story in Marathi

Kombadiche Ande Akbar Birbal Story in Marathi
Kombadiche Ande Akbar Birbal Story in Marathi

बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून अकबरला हे माहिती होते की, बिरबरसोबत मजाक करणे सोपी गोष्ट नाही. तरीसुध्दा अकबर स्वतःला थांबवू शकत नसे व कधीकधी बिरबलाशी मजाक करत असे.

एके दिवशी बिरबल दरबारात येण्यापूर्वी अकबरने दरबारातील सर्व दरबाऱ्यांना एक एक कोंबडीचे अंडे दिले व त्यांना बिरबला सोबत करण्याच्या गंमती बद्दल योजना सांगितली.

नेहमीप्रमाणे जेव्हा बिरबल दरबारात आला तेव्हा अकबर त्याला म्हणाला, ‘काल रात्री मला एक स्वप्न पडले त्यात एका ऋषींनी मला सांगितले की, जे दरबारी बागेतील तलावात जातील व तलावातून आपल्या बरोबर हातात अंडे घेऊन येईल तेच माझ्यासाठी निष्ठावंत असतील. तरी आता सर्वांनी तलावात जाऊन त्यातून एक एक अंडे आणावे.’

त्यानुसार, सर्व दरबाऱ्यमधून एक एक दरबारी तलावातील पाण्यात डुबकी मारून आपल्या बरोबर एक अंडे घेऊन बाहेर येत होते. शेवटी आता बिरबलचा नंबर होता.

बिरबलने तलावात उडी मारली परंतु अंडे सापडण्यात तो अयशस्वी झाला. त्याला त्वरीत लक्षात आले की ही अकबरची माझ्यासोबत मजाक करण्याची योजना दिसत आहे.

बिरबल तलावाच्या बाहेर येताच कोंबडयाच्या आवाजात ओरडु लागला. कोंबडयाच्या त्या आवाजामुळे अकबर संतप्त झाला. तो बोलला, ‘तू वेडा झाला आहेस का? तलावातून प्रत्येक जण आपल्या सोबत अंडे घेऊन आला परंतु तुझ्या हातात अंड नाही. असे का?’

बिरबल बोलला ‘महाराज! फक्त कोंबडयाच अंडे घालू शकतात. मी तर कोंबडा आहे.’
अकबरने दरबाऱ्यांकडे बघितले व चोरून हसला. व दरबाऱ्यांनी गोंधळून आपले हात कपाळावर मारले.


जितकी लांब चादर तितकेच पाय पसरावे | Jitaki Lamb Chadar Titkech Pay Pasrave Marathi Katha

chatur birbal story in marathi
chatur birbal story in marathi

अकबरच्या दरबाऱ्यांची नेहमीच एक तक्रार असे की बादशाह नेहमी बिरबललाच बुध्दीमान मानतात बाकीच्यांना नाही.

एक दिवस अकबरने सर्व दरबाऱ्यांना दरबारात बोलविले आणि दोन हात लांब व दोन हात रूंद चादर त्यांच्याकडे देत म्हणाले, ‘या चादरीने तुम्ही लोकं मला डोक्यापासून तर पायापर्यंत झाकून दाखवा तर मी तुम्हाला बुध्दीमान मानेल.’

सर्व दरबाऱ्यांनी प्रयत्न केला परंतु ते त्या चादरीने अकबरला पूर्णपणे झाकू शकले नाही. डोके झाकले तर पाय बाहेर रहायचे, आणि पाय झाकले तर डोके चादरीच्या बाहेर रहायचे.

आडवे, उभे, तिरपे सर्व प्रकारांनी प्रयत्न करून देखील कोणालाही त्यात यश आले नाही.

आता अकबरने बिरबलला बोलविले व तीच चादर त्याला देत अकबराने स्वतःला त्यात झाकून दाखविण्यास सांगितले.

जेव्हा अकबर खाली झोपला तेव्हा बिरबलने अकबरचे पसरलेले पाय मुडपण्यास सांगितले. अकबरने बिरबलने सांगितल्याप्रमाणे पाय मुडपले आणि बिरबलने अकबरला आता डोक्यापासून पायापर्यंत चादरीने झाकले.

सर्व दरबारी आश्चर्याने बिरबलकडे बघत होते. तेव्हा बिरबल बोलला, ‘जेवढी लांब आपली चादर असेल तेवढेच आपण पाय पसरावेत.’


बिरबलाची युक्ती | Birbalachi Yukti Akbar Birbal story in marathi

Birbalachi Yukti Akbar Birbal story in marathi
Birbalachi Yukti Akbar Birbal story in marathi

एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उद्या ह्याच वेळी मिळेल.”असे तो म्हणाला

बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन.

दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न.

बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच.

शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला खाविंद, माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला.


रेघ लहान झाली | Lekh Lahan Zali Akbar Birbal story in marathi

Lekh Lahan Zali Akbar Birbal story in marathi
Lekh Lahan Zali Akbar Birbal story in marathi

अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?”

बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले. थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला!


हा नोकर चोर आहे | Ha nokar chor aahe Akbar Birbal story in marathi

Ha nokar chor aahe Akbar Birbal story in marathi
Ha nokar chor aahe Akbar Birbal story in marathi

एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.

बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.

दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.

त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.’ शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.


विहिरीचे लग्न | Vihiriche Lagn Akbar Birbal story in marathi

Vihiriche Lagn Akbar Birbal story in marathi
Vihiriche Lagn Akbar Birbal story in marathi

एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो. तुझी मला मुळीच गरज नाही.

बिरबल अतिशय स्वाभिमानी होता. तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला आणि एका गावात वेश बदलून राहू लागला.

बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही. बादशाहला मात्र सारखी त्याची उणीव भासे, त्याची कामे अडून राहू लागली आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहला त्याच्या शिवाय करमत नव्हते. अन्न गोड लागत नव्हते. बादशाहाने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला. परंतु बिरबल सापडत नव्हता.

बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला. बादशाहने बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले होते. त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली. त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली. राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे.

लग्न समारंभ थाटात होणार आहे. तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरीसह उपस्थित रहावे. जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड केला जाईल. सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना.

बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोकहि चिंतेत पडले होते. गावच्या पुढारींना या समस्येला कसे तोंड द्यावे समजत नव्हते. ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली. अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता. त्याने गावकरींना जाण्याची युक्ती सांगितली.

गावकरी खुश झाले. एक दिवस गावातील पाच-सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून दिल्लीला गेले. दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले, “खाविंद आपल्या आज्ञेप्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत.”

आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत. तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे. त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि ओरडला, बिरबल सापडला!

बादशहा म्हणाला, अजून पर्यंत एकही गावाचे लोक राजधानीत आले नाही. तुम्हीच प्रथम हजर झाला. तुम्हाला हि युक्ती कोणी सांगितली?

“एका शेतकऱ्याने महाराज!”, गावकऱ्यांनी नम्र पने उत्तर दिले. तो शेतकरीच माझा बिरबल आहे. बादशाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ताबडतोब त्याने माणसांबरोबर लवाजम्यासहित काझीला पाठवले. बिरबलला राजधानीत सन्मानाने आणण्याचा हुकुम दिला.

बिरबल बादशाच्या महालात आला आणि त्याने बिरबलाला मिठी मारली.


का रडतोस? | Ka Radtos Akbar Birbal story in marathi

Ka Radtos Akbar Birbal story in marathi
Ka Radtos Akbar Birbal story in marathi

बिरबलाला घाबरवून टाकावे, या उद्देशाने बादशहाने एकदा आपण भयंकर भडकलो आहोत, असा खोटाच आव आणीत तो बिरबलाला वाटेल तसे बोलू लागला.

परंतु आपल्या बोलण्याने घाबरून न जाता उलट बिरबल मोठमोठ्याने रडायला लागल्याचे पाहून अचंबित झालेला बादशहा त्याला म्हणाला – ”बिरबल, अरे, मी इतका भडकलो असता तू भीती वाटून थरथर कापशील, असे मला वाटले होते, उलट त्याऐवजी हल काढून तू का रडायला लागलास ? ”

बादशहाने असे विचारताच त्याला एका बाजूला नेऊन बिरबल म्हणाला, ”महाराज, माझा कसलाही अपराध नसताना तुम्ही माझ्यावर एवढे भडकलात की, मला असे वाटते की तुमच्या डोक्यात काही तरी फरक झाला. साहजिकच ‘आता आपल्या राज्याचे आणि प्रजेचे कसे होणार?’ या काळजीने माझा शोक अनावर झाला” बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा फारच खजील झाला.


काल आज आणि उदया | Kal aaj aani Udya Akbar Birbal Marathi Story

दरबाराचे कामकाज चालू होते. सर्वजण एका अशा प्रश्नावर चर्चा करत होते की राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टिने महत्वाचे होते. सर्व एक एक करून आपले मत व्यक्त करत होते. अकबर दरबारात बसून हे सर्व ऐकत होता व त्याला असे जाणवले की सर्वांचे म्हणणे वेगवेगळे आहे. त्यांना आश्चर्य वाटले की सर्व एकसारखेच विचार का करत नाही!

अकबरने बिरबलला विचारले, ‘तू मला सांगू शकतो का, की लोकांमधील प्रत्येकाचे मत आपापसात का मिळत नाही? सगळे वेगवेगळया पध्दतीने विचार का करतात?’

‘प्रत्येक वेळेस असे होत नाही, महाराज!’ बिरबल बोलला, ‘काही समस्या अशा असतात की ज्यावर सर्व एकसारखे विचार करतात.’ यानंतर कामे आटोपून दरबारातील कार्यवाही समाप्त झाली व सगळे आपापल्या घरी निघून गेले.

त्या संध्याकाळी अकबर आणि बिरबल बागेत फिरत होते, तेव्हा अकबरने पुन्हा सकाळचा प्रश्न बिरबलला केला व त्याबद्दल निरसन करायला सांगितले. त्यानंतर बिरबलने बागेत एका कोपऱ्यात बोट करून सांगितले की , ‘त्या तिथे झाडाजवळ एक विहीर आहे तिथे चला, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा लोकांशी निगडीत काही समस्या असतात तेव्हा सर्वजण एकसारखाच विचार करतात. माझे म्हणणे असे आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यावर लोकांचे विचार एकसारखेच असतात.’

अकबरने विहीरीजवळ काहीवेळ बघितले व बोलला, ‘परंतु मला काहीही समजले नाही, तुझी समजवण्याची पध्दत जरा वेगळीच आहे.’ अकबरलाही माहीत होते की बिरबल आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी असेच काहीतरी प्रयोग करत असतो.

‘सर्व काही समजेल महाराज!’ बिरबल बोलला.‘आपण राजकीय आदेश जाहीर करा की राज्यातील प्रत्येक घरातून एक तांब्या दूध बागेत असलेल्या विहीरीत आणून टाकले जावे. पौर्णिमेचा दिवस असेल. आपले राज्य खूप मोठे आहे, जर प्रत्येक घरातून एक तांब्या दूध या विहीरीत पडले तर ही विहीर दूधाने भरून जाईल.’

बिरबलचे हे बोलणे ऐकून बादशहा अकबर जोरजोरात हसू लागला. तरीपण त्याने बिरबलने सांगितल्याप्रमाणे राजआदेश काढला. पूर्ण राज्यात दवंडी पिटवली गेली की, ‘येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक तांब्या दूध शाही बागेतील विहीरीत आणून टाकावे. जो असे करणार नाही त्याला शिक्षा दिली जाईल.’

पौर्णिमेच्या दिवशी बागेच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवले गेले की प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती आलेली आहे. सर्वांच्या हातात भरलेले भांडे दिसत होते.

अकबर आणि बिरबल लांब बसून हे सर्व काही बघत होते आणि एकमेकांकडे बघून हसत होते. संध्याकाळ होण्याच्या आधी विहीरीमध्ये दूध टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. प्रत्येक

घरातून दूध आणून विहीरीत टाकले गेले होते.

जेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले तेव्हा अकबर व बिरबल दोघेही विहीरीजवळ गेले व विहीरीमध्ये त्यांनी डोकवून बघितले. विहीर काठोकाठ भरलेली होती. परंतु विहीर दूधाच्या ऐवजी पाण्याने भरलेली होती हे बघून अकबर चकित झाला.

हैराण झालेल्या नजरेने अकबरने बिरबलकडे बघत विचारले, ‘असे का झाले? शाही आदेश तर विहीरीत दूध टाकण्याचा निघाला होता, परंतु हे पाणी कुठुन आले? लोकांनी दूध का नाही टाकले?’ बिरबल जोरात हसून बोलला, ‘हेच मला सिध्द करायचे होते महाराज! मी तुम्हाला सांगितले होते ना की बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यावर लोक एकसारखा विचार करतात. हे पण त्याचेच एक उदाहरण होते. लोक बहुमूल्य दूध वाया घालवायला तयार नव्हते त्यांना माहीत होते की विहीरीत दूध टाकणे व्यर्थ आहे त्यामुळे त्यातून त्यांना काही मिळणार नाही. त्यामुळे विहीरीत दूधाऐवजी पाणी टाकले तर कोणालाही समजणार नाही असा विचार त्यांनी केला व सर्वांनी दूधाऐवजी पाणीच विहीरीत ओतले. याचा परिणाम दूधाच्या ऐवजी विहीर पाण्याने भरली.’

बिरबलची चतुराई बघून अकबरने त्याची पाठ थोपटली. बिरबलने सिध्द करून दाखविले की कधी कधी लोकं एकसारखाच विचार करतात.


आकाशात किती तारे असतील | Aakashat kiti tare astil Birbal Akbar Marathi Katha

Aakashat kiti tare astil Birbal Akbar Marathi Katha
Aakashat kiti tare astil Birbal Akbar Marathi Katha

राजवाड्याच्या गच्चीवर बसून एके रात्री बादशहा व बिरबल गप्पा मारत होते. तेवढ्यात बादशहा बिरबलला म्हणाला, ”बिरबल, या आकाशात किती तारे असतील बरे?”

यावर बिरबलने जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाला एक परातभर मोहर्‍या घेऊन येण्याचा हुकूम केला. सेवक जाताच आकाशाकडे पाहत बिरबल आपण जसे काही तारेच मोजीत आहेत, असे नाटक करू लागला.

थोड्या वेळाने मोहर्‍या भरलेली परात आणून ती सेवकाने बिरबलाच्या पुढे ठेवली. मग तारे मोजण्याचे नाटक बंद करून ती परात बादशहापुढे ठेवीत तो म्हणाला, ”खाविंद, जेवढ्या मोहर्‍या या परातीत आहते, बरोबर तेवढेच तारे या आकाशात आहेत. नेमके तारे किती आहेत, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर या परातीतील एकेक मोहरी मोजीत, अशा सर्व परातभर मोहर्‍या मोजीत बसा, म्हणजे तुम्हाला तार्‍यांची संख्या समजेल. ”

यावर बादशहा म्हणाला, ”बिरबल, त्याची काहीच गरज नाही. केवळ या मोहर्‍या मोजीत मला माझे उरलेले आयुष्य खर्च करायचे नाही. ‘


बोलून-चालून गाढवच | Bolun Chalun Gadhvach Akbar Birbal story in marathi 2024

Bolun Chalun Gadhvach Akbar Birbal story in marathi
Bolun Chalun Gadhvach Akbar Birbal story in marathi

बिरबलाला तंबाखू खाण्याचा नाद होता. हुक्की आली, ती तो मधूनच तंबाखूची चिमूट तोंडात टाकून बराच वेळ ती चघळत असे.
एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सांयकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले.

त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालले असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा वास घेई आणि न खाताच पुढे निघून जाई.

असे त्याने दोन-चार वेळा केले, बिरबलाला टोमणा देण्याच्या हेतूने बादशहा म्हणाला, ”बिरबल, बघितलंस ना? तो गाढवसुद्धा तंबाखूला तोंड लावीत नाही.” तेव्हा बिरबल म्हणाला, ”महाराज, अहो ते बोलून-चालून गाढवच. त्याला तंबाखू खाण्याची मजा काय कळणार?”

बिरबलाने आपल्याला फिरवून टोमणा मारल्याचे पाहून बादशहा फारच केविलवाणा झाला.


शिपाही झाला मौलवी | Shipai Zala Maukavi Akbar Birbal Marathi Katha

अकबर बादशहाच्या दरबारात एक करीम नावाचा सेवक काम करत होता. त्या करीमला खूप इच्छा होती की सगळ्यांनी आपल्याला मौलवी म्हणाले. पण हां ठरला एक मूर्ख शिपाई. याला कोण मौलवी म्हणणार? म्हणून करीम एकदा बिरबलाकडे गेला आणि बिरबलाला म्हणाला. बिरबल साहेब, तुम्हाला लोक हुशार म्हणून समजतात. तुम्ही अशी काही तरी जादू करा की ज्याच्यामुळे सगळे लोक मला मौलवी साहेब, मौलवी साहेब असं म्हणतीत.

बिरबल स्वतःशीच हसला आणि म्हणाला, अरे करीम तुला काय अशी इच्छा झाली मौलवी म्हणून घ्यायची? त्यावेळी तो म्हणाला. म्हणजे काय? दरबारातला शिपाई म्हणून मला काही मान आहे का? अजिबात नाही. मौलवीसाहेब म्हटलं की कस मला मान मिळेल? त्यावर बिरबल म्हणाला अरे. काहीतरी शिकला आणि खरोखरीच मौलवी झाला तर लोक आपोआप मौलवीसाहेब म्हणावे लागतील.

त्याच्यावर करीम म्हणाला. छे छे महाराज. मला आता शिक्षण वैगरे काही करायला सांगू नका. पण हा तजवीज मात्र करा कीं लोकांनी मला कुठल्याही परिस्थितीत मौलवीसाहेब म्हटलेच पाहिजे. बिरबलाने थोडा विचार केला आणि त्यांनी त्या करीमला सांगितलं. बरं. मी सांगतो ते जर केलं तर मात्र नक्की काही दिवसात लोक तुला मौलवीसाहेब म्हणू लागतील.

करीम म्हणाला, हो हो तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. पण मला काही दिवसात लोकांनी मौलवीसाहेब म्हणायलाच पाहिजे. बिरबल म्हणाला ठीक आहे. तू एक काम करायचं. आता आजपासून पुढे तुला कोणीही मौलवीसाहेब म्हटलं की त्याच्या मागे दंडा घेऊन लागायचं मारायला. काबूल. करीमला काही कळेचना. तो म्हणाला. बिरबल महाराज असं का उल्टा सांगताय मला लोकांनी मौलवीसाहेब म्हणावे अशी माझी इच्छा आहे आणि लोकांनी मौलवीं साहेब म्हटलं की त्यांच्या मागे मी काठी घेऊन मारायला हा काही उपाय सांगता?

बिरबल म्हणाला. हे बघ करीम मी जे सांगेन ते तू करणार असशील तरच मी तुला उपाय सांगेन. त्यावर करीम म्हणाला बर बर महाराज तुम्ही सांगाल तस मी करेन. असे म्हणून करीम बाहेर निघून गेले. त्याच्यानंतर बिरबलाने दिल्लीमधल्या सगळ्या पोरा सोराना एकत्र केलं आणि त्याला सांगितलं. अरे तो दरबारातला करीम आहे ना तो तुम्हाला दिसला की तुम्ही त्याला मौलवीसाहेब म्हणून चिडवायचं का? आणि एकदा त्याला का मौलवीसाहेब तुम्ही चिडवलं की बघा कसा तो चिडून तुमच्या मागे लागतो.

तुम्हाला खूप मजा येईल. मग काय मुलांना तर आयतीच मजा करायला मिळणार होती. दुसऱ्या दिवशी करीम जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावरून जायला लागला तेवढ्या सगळ्या पोरांनी ओ हो हो मौलवीसाहेब ओ हो मौलवीसाहेब काय म्हणता असं करून त्याला चिडवायला सुरुवात केली आणि करीमनी बिरबलाने सांगितलं होतं त्याप्रमाणे हातात सोटा घेऊन त्या मुलांच्या मागे लागायला सुरुवात केली. तो त्यांना मारायला उठवायला लागला. असं बरेच दिवस हा खेळ चालू होता. आणि प्रत्येक वेळेला कोणीतरी मौलवी साहेब असं म्हटलं की हा करीम सोटा घेऊन त्या माणसाला मारायला निघायचा.

असं करत करत 2-3 महिने गेले. मुलांनी जशी त्याला मौलवी बोलायला सुरुवात केली तशी हळूहळू मोठ्या माणसांनीसुद्धा करीमला मौलवीसाहेब मौलवीसाहेब काय म्हणताय ….. अशी त्याची गम्मत सुरू केली. आणि बघता बघता तीन महिन्यांमध्ये लोकं करीमचे मूळ नाव विसरले आणि सगळे जण संपूर्ण दिल्लीतले लोक करीमला मौलवीसाहेब म्हणूनच ओळखायला लागले.

हे झाल्यानंतर एकदा बिरबलानी. करीमला परत बोलावलं आणि बिरबल करीमला म्हणाला. आता एक काम करायचं. उद्यापासून कोणीही मौलवीसाहेब म्हंटल की काठी घेऊन त्यांना अंगावर मारायला न धावता. अगदी रुबाबात. धन्यवाद. शुक्रिया. असं म्हणाय. करीमला काही कळेचना. आताही असं का सांगत आहे तुम्ही? त्यावर बिरबल म्हणाला, उद्यापासून बघ म्हणजे कळेल. दुसर् या दिवशीपासून जेव्हा करीम रस्त्याने जायला लागला त्याला सगळे दिल्लीकर त्याला बघून हसून काय? मौलवी साहेब आज इकडे कुठे काय? मौलवीसाहेब काय मौलवीसाहेब असे करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न करायला. पण आज मात्र झालं उलटंच आज या नवीन मौलवीसाहेबांनी सगळ्यांना हसून शुक्रिया द्यायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे झालं काय त्या दिवसापासून करीम मौलवीसाहेब जो झाला तो कायमसा?

 


मेल्यावर मुठी उघड्या का असतात | Melyavar Muthi Ughdya ka Astat akbar birbal kahani in marathi

Melyavar Muthi Ughdya ka Astat akbar birbal kahani in marathi
Melyavar Muthi Ughdya ka Astat akbar birbal kahani in marathi

एकदा बादशहाने बिरबलला विचारले, ”बिरबल, खरे तर माणूस जन्माला येताना मुठी बंद करून येतो, पण या जगातून जाताना त्याच्या मुठी उघड्या का बरे असतात?”

बिरबल म्हणाला, ”खाविंद, माणूस जन्माला येताना सभोवतालच्या लोकांना सांगत असतो की, मला जे जे घ्यावंसं वाटेल, ते मी माझ्या मुठीत याप्रमाणे घट्ट पकडून माझं करीन. परंतु मरताना मात्र आपल्या मुठी उघड्या ठेवून तो भोवतालच्या लोकांना सांगू पाहतो की, तुम्ही जगातील वस्तूंचा लोभ धरू नका.

आयुष्यभर लोभापायी मी माझ्या मुठी भरल्या, पण त्या सर्व गोष्टी इथेच ठेवून मला रिकाम्या हाताने जग सोडावे लागत आहे. माणूस या जगात प्रवेश करताना बंद मुठीने येतो, पण जाताना त्याच्या मुठी उघड्या का असतात, त्याचे असे स्पष्टीकरण आहे.”


पाच मूर्ख | Pach Murkh Akbar Birbal Marathi Katha pdf

Pach Murkh Akbar Birbal Marathi Katha pdf
Pach Murkh Akbar Birbal Marathi Katha pdf

अकबर बिरबल सभेत बसून गोष्टी करत होते. तेव्हाचं अकबर म्हणाला मला या राज्यातील 5 मूर्ख शोधून दाखवं. राजाचा आदेश ऐकून बिरबलाने शोध सुरू केला. एका महिन्यानंतर बिरबल दोन लोकांना घेऊन परतला तर अकबर म्हणाला, मी तर तुला 5 मूर्ख आण्यासाठी सांगितले होते आणि तू फक्त दोनचं घेऊन आला.

पहिला मूर्ख: यावर बिरबल म्हणाला, सम्राट! हा पहिला मूर्ख आहे. मी याला बैलगाडीवर बसून जड बॅगचं ओझं डोक्यावर घेताना पाहिले. कारण विचारल्यावर हा म्हणाला की बैलाला जास्त ओझं नको म्हणून मी ते डोक्यावर घेतलं आहे. या प्रकारे हा पहिला मूर्ख आहे.

दुसरा मूर्ख: हा दुसरा मूर्ख जो आपल्या म्हशीला गवत खिलवण्यासाठी गच्चीवर घेऊन जातो. कारण विचारल्यावर म्हणाला की गच्चीवर गवत उगते म्हणून मी म्हशीला वरती नेतो. हा माणूस गच्चीवरील गवत कापून फेकू शकत नाही आणि म्हशीला वर घेऊन जातो म्हणजेच की हा दुसरा मूर्ख आहेत.

तिसरा मूर्ख: सम्राट! आपल्या राज्यात इतके काम आहे, पूर्ण राज्याची नीती मला संभालायची आहे. असे असूनही मी या मूर्खांना शोधण्यासाठी एक महिना वाया घालवला म्हणून तिसरा मूर्ख मीच आहे.

चौथा मूर्ख: सम्राट! पूर्ण राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सुपीक डोके असणार्‍यांकडून आपण कामाची अपेक्षा ठेवू शकतो आणि मूर्ख लोकं आमच्यासाठी मुळीच कामाचे नाही तरीही आपण मूर्खांच्या शोधात आहे या अर्थी आपण चौथे मूर्ख आहात.

पाचवा मूर्ख: सम्राट! आता मी सांगू इच्छित आहोत की सगळ्यांना इतके काम आहेत. आपआपल्या नोकरी-धंध्यातील इतके महत्त्वाचे काम सोडून जो हा किस्सा वाचत आहे आणि पाचवा मूर्ख कोण हे माहीत करण्यासाठी अजून ही वाचतोय तोच पाचवा मूर्ख आहेत.


कोण शहाणा, कोण मूर्ख | Kon Shahana Kon Murkh Marathi Katha

Kon Shahana Kon Murkh Marathi Katha
Kon Shahana Kon Murkh Marathi Katha

दरबारातील मंडळींना एकदा बादशहाने विचारले, ”कोणाला शहाणा म्हणावे आणि मूर्ख कोणाला म्हणावे?”

यावर दरबारी मंडळी उत्तरादाखल बरेच मोठे चर्‍हाट वळू लागली असता बादशहा भडकून बिरबलाला म्हणाला, ”बिरबल, तू दे बर माझ्या प्रश्नाचे उत्तर!”

यावर बिरबल म्हणाला, ”महाराज, जो माणूस मनात योजलेले बेत मेहनत, चिकाटी आणि योजना करून तडीस नेतो, तो शहाणा, आणि नुसतेच मोठमोठे बेत करून जो माणूस ते विसरून जातो किंवा योजलेली कामे तडीस नेण्यासाठी त्याची सुरुवात करून ती अर्धवट अवस्थेत सोडून देतो, तो मूर्ख.”

बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा समाधान पावला.


अधिक चतुर | Adhik Chatur Akbar Birbal Marathi Katha

बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले

पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.

पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?

बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.

बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ”खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.”


बिरबलजींचे घर माहीत आहे का अकबर बिरबल मराठी कथा | Birbaljinche Ghar Mahiti aahe ka 

बिरबलजींचे घर माहीत आहे का अकबर बिरबल मराठी कथा
बिरबलजींचे घर माहीत आहे का अकबर बिरबल मराठी कथा

बिरबलाची राहणी एकदम सादी होती. फक्त दरबारात जाताना तो उंची कपडे वापरत असे. असेच एकदा तो साधे कपडे घालून आपल्या घराच्या फाटकातून बाहेर पडून रस्त्याला लागला असता त्याला एक इसम भेटला व त्याने बिरबलाला विचारले, ”काय रे, तुला बिरबलजींचे घर माहीत आहे का?” तेव्हा बिरबलाने घराकडे बोट दाखविले व तो तेथून निघून गेला. तो इसम बिरबलाच्या घरी गेला असता तेथील सेवकाने ‘ते इतक्यातच बाहेर गेले आहेत, परंतु लवकरच परत येणार आहेत,’ असे सांगून एका बैठकीवर बसण्यास सांगितले.

अगदी थोड्याच अवधीत बिरबल पुन्हा घरी आला आणि आपल्याला मघाशी रस्त्यात भेटलेला माणूस म्हणजेच बिरबलजी आहेत, हे समजताच तो इसम फारच ओशाळला व बिरबलला म्हणाला, ”बिरबलजी, थोड्या वेळापूर्वी आपण मला रस्त्यात भेटलात, तेव्हा मी बिरबलजी कोठे राहतात, असा प्रश्न विचारला असता, आपणच बिरबल असल्याचे तेव्हा का बरे सांगितले नाहीत?”

यावर बिरबल म्हणाला, ”तुम्ही मला रस्त्यात भेटलात, तेव्हा मला अरे-तुरे असे संबोधू लागलात. तेव्हा मला वाटले, आपण कोणी तरी बडी आसामी आहात. आणि मग मी तर तुमच्यापुढे अगदीच मामुली ! म्हणून बड्या आसामीने विचारलेल्या प्रश्नाला अगदी मोजकेच उत्तर द्यायला नको का? त्याकरिता मी आपल्या प्रश्नाप्रमाणे उत्तर दिले.”

बिरबलने असा ठेवणीतला टोला मारल्याने त्या गर्विष्ठ माणसाचा नक्षा उतरला व त्याने बिरबलाची माफी मागितली.


मोठा माणूस होशील | Motha Manus Hoshil Akbar Birbal Story in Marathi

Motha Manus Hoshil Akbar Birbal Story in Marathi
Motha Manus Hoshil Akbar Birbal Story in Marathi

जवळच्या गावात असलेल्या नातेवाइकांकडे आठ-दहा वर्षांचा महेशप्रसाद आपल्या ‍वडिलांसोबत जायला निघाला, म्हणून आई त्याला म्हणाली, बाळा जेवण करून जा. तेव्हा तो आईला म्हणाला, ”आई, मला बिलकुल भूक नाही आहे, तर जेवणात वेळ फुकट कशाला घालवू?” नंतर महेश व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले. काही अंतर चालून गेल्यानंतर भुकेने महेशच्या पोटात कावळे ओरडायला लागले. इतक्यात रस्त्याच्या एक कडेला ब्रह्मदेवाचे मंदिर दिसले, म्हणून महेशचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले.

मंदिराच्या गाभार्‍यातील ब्रह्मदेवाच्या चतुर्मखी म्हणजे चार मुखे असलेल्या मूर्तीला वडील भक्तिभावाने नमस्कार करू लागले, तेव्हा भुकेने कासावीस झालेला महेश रडू लागला. हे बघून वडिलांनी त्याला विचारले, ”महेश, का रे बाळा असा का बर रडतोस आहे ?”

आई आपल्याला जेवण करून जा, असे सांगत असूनही आपण तिचे ऐकले नाही. आणि आता जर वडिलांना सांगितले, तर ते आपल्यास रागवतील, अशी भीती वाटून हजर जबाबी महेश वडिलांना म्हणाला, ”बाबा, मला एकच नाक आहे व सर्दी झाल्यानंतर ते वाहू लागले की, पुसून-पुसून नाकी नऊ येतात, तर मग या चार मुखे असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली आणि याची चारही नाके एकाच वेळी वाहू लागली, तर याचे कशे हाल होत असतील? त्याच्या त्या वेळी होणार्‍या फक्त कल्पनेनेच मला रडायला येत आहे.”

आपला मुलगा का रडत आहे, हे माहीत असल्यामुळे त्याने सांगितलेली सबब ऐकताच वडील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ”बाळा, तू पुढे फार मोठा माणूस होशील.”

तसेच एकदा महेश सोळा वर्षांचा असताना एकटाच रानातील रस्त्याने परगावी चालला होता. इतक्यात एका झाडीतून एक वाघ बाहेर आला आणि त्याच्या अंगावर धावला. तेव्हा त्याच्याशी महेशने कडवी झुंज देऊन त्याला पळून जाण्‍यास भाग पाडले. तेव्हापासून अंगात वीराचे असलेल्या महेशला लोक मोठ्या प्रेमाने ‘वीरबल’ असे म्हणू लागले, आणि पुढे वीरबल म्हणता-म्हणता त्याचे नाव बिरबल झाले.


थोडं-फार येतं | Thod far yet Akbar birbal marathi goshti

Thod far yet Akbar birbal marathi goshti
Thod far yet Akbar birbal marathi goshti

आधी न कळवता आजारी बिरबलाला पाहण्यासाठी अचानक बादशहा त्याच्या घरी गेला. घरापुढील अंगणात प्रवेश करता-करता, बिरबलच्या तिथेच खेळत असलेल्या दहा-बारा वर्षांच्या मुलीस बादशहाने उर्दूत विचारले, ”बेटी, तुझे वडील घरात आहेत का?”

बादशहाच्या याच नाही, तर आणखी दोन-तीन उर्दूत विचारलेल्या प्रश्नांना बिरबलच्या त्या चुणचुणीत मुलीने अगदी योग्य अशी समर्पक उत्तरे उर्दूतूनच दिली. ती उत्तरं ऐकून त्याने तिला विचारले,

”बेटी, तुला उर्दू बोलता येतं वाटतं?”

त्यावर बिरबलकन्या म्हणाली, ”थोडं-फार येतं.”

तेव्हा बादशहानं विचारलं, ”थोडं-फार म्हणजे किती?”

यावर बिरबलाची मुलगी म्हणाली, ”महाराज, ज्यांना उर्दू फार येतं, त्यांच्याशी तुलना केली तर मला ‘थोडं, येतं आणि ज्या लोकांना ते अगदीच ‘थोडं’ येतं, त्यांच्याशी तुलना केली तर, मला ते फार येतं.” बापाचे चातुर्य बेटीतही सहीसही उतरलेले पाहून बादशहाने कौतुकाने तिची पाठ थोपटली.


त्यात अशक्य काय आहे | Tyat ashakya Kay hote akbar birbal story in marathi

Tyat ashakya Kay hote akbar birbal story in marathi
Tyat ashakya Kay hote akbar birbal story in marathi

बादशहा, दरबारी मंडळी आणि बिरबल असे सर्व लोक एकदा यमुनेचया वाळवंटात फिरायला गेले, तेव्हा सहज म्हणून बादशहाने यमुनेच्या स्वच्छ रेतीत हातातील काठीने एक रेषा काढली. नंतर बरोबरच्या मंडळीकडे पाहून तो म्हणाला, ”या रेषेला अगदी थोडाही स्पर्श न करता, आपणापैकी कोणी तिला लहान करून दाखवील का?”

बिरबल वगळता सर्वजण म्हणाले, ” खाविंद, ते कसे शक्य आहे?””त्यात अशक्य काय आहे?” असे म्हणून बिरबलाने बादशहाने आधी काढलेल्या रेषेजवळच तिला समांतर अशी तिच्यापेक्षा लांब रेषा काढली व मग बादशहाने काढलेल्या रेषेकडे त्याचे लक्ष वळवून बिरबल म्हणाला, ”खाविंद, पाहा बरे, मी काढलेल्या लांब रेषेमुळे तुमची रेषा एकदम लहान वाटू लागली का नाही? शिवाय तुमची अट पाळून.” बिरबलाच्या या युकतीवर बादशहा एकदम खूष झाला.


आपण गासडी चोरली नाही | Aapan Gasadi Chorali Nahi chatur birbal story

Aapan Gasadi Chorali Nahi chatur birbal story
Aapan Gasadi Chorali Nahi chatur birbal story

एकदा कापसाच्या वखारीत काम करीत असलेल्या सात-आठ नोकरांपैकी एकाने बरीच मोठी कापसाची एक गासडी चोरली आणि पैसे घेऊन कोणाला तरी विकली. ही गोष्ट मालकाला समजल्यावर त्याने सर्वांना दम देऊन विचारले, प्रत्येक जण ‘आपण गासडी चोरली नाही,’ असी शपथ घेऊन सांगू लागले. शेवटी वैतागून मालकाने हे प्रकरण बिरबलाकडे नेले.

बिरबलाने सर्व नोकरांना आपल्याकडे बोलवून एका रांगेत समोरच उभे केले. त्या सर्वांना एकदा पाहून तो खो खो हसत सुटला. त्याच्या मालकाला खोटेच म्हणाला, ”मालक, ज्या नोकराने डोक्यावर ठेवून कापसाची गासडी पळविली, त्याच्या मुंडाशाला कापूस लागलेला आहे. त्याने तो झटकण्याची काळजी न घेतल्याने तो आयताच आपल्या हाती लागला.

बिरबलाने असे म्हणताच ज्या नोकराने चोरी केली होती, तो आपले मुंडासे चाचपडू लागला. लागलीच ‘हाच कापूसचोर असणार,’ हे बिरबलाने ओळखले आणि त्या नोकराला फटक्यांची धमकी देताच त्या नोकराने कापसाची गासडी चोरून नेल्याचे कबूल केले.


माझ्या आज्ञेत राहावे लागेल | Majhya aadnet rahaave lagel akbar and birbal story in marathi

एकदा बिरबल आणि बादशहात कसल्या तरी मुद्यावरून वादावादी झाली. त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला. असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक करीमखान नावाचा सरदार त्याला म्हणाला, ”बिरबलजी, खाविंद आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रिपद काढून घेतील आणि तुम्हाला कुत्तेवान म्हणजे कुत्र्यांवरचा अधिकारी म्हणून नेमतील.”

यावर एका क्षणात बिरबल म्हणाला, ”करीमखान, खाविंदांनी जरी मला कुत्र्यांवरचा अधिकारी नेमले, तरी त्यात मला आनंदच वाटेल, कारण तुम्हाला मग माझ्याच आज्ञेत राहावं लागेल.” बिरबलाने आपल्याला कुत्र्याच्या रांगेत बसविल्याचे पाहून करीमखान दात-ओठ खात तेथून निघून गेला.


जे होतं ते चांगल्यासाठीच | Je hote te changlyasathich 2024

Je hote te changlyasathich
Je hote te changlyasathich

एकदा अकबर आणि बिरबल शिकरीला जात असतात, तलवार काढताना अकबर चा अंगठा कापला जातो… अकबरला खूप त्रास होतो, तो ओरडायला लागतो… तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून… शहरात पाठवतो… तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ”महाराज…शांत व्हा…जे होतं ते चांगल्यासाठीच होतं…”

अकबर ला राग येतो…तो जास्तच चिडतो…आणि शिकयांना सांगतो ” जा बिरबल ला घेऊन जा…रात्रभर उलटं टांगून ठेवा….आणि सकाळी-सकाळी फाशी द्या ” सर्व शिपाई तिथून निघून जातात….अकबर एकटाच जंगलात असतो….तो एकटाच पुढे शिकार करायला जातो…!!

पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात.. अकबर ची बळी ते देणार असतात…त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात…तितक्यात एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व तो ओरडून सर्वांना सांगतो ,” हा अशुद्ध आहे…आपण याची बळी नाही देऊशकत… याचा अंगठा तुटलेला आहे…”

आदिवासी अकबर ला सोडून देतात…आणि त्याला बिरबल चं बोलणं आठवतं,’ जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..’ तो धावत पळत त्याच्या महलात येतो, बिरबल ला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबलला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत सांगतो….आणि म्हणतो, ” मला माफ कर….तुझ्यामुळे मी वाचलो…आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली….”

” बिरबल हसतो आणि म्हणतो, ”नाही महाराज….जे होते ते चांगल्यासाठीच होता…” अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं कसं…तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला…चांगलं कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, ” महाराज…मी जर तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर त्यांनी माझा बळी दिला असता…..म्हणून म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….

तात्पर्य: मित्रांनो, आयुष्यात असे क्षण येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं….कदाचित पुढे त्याचा ऊपयोग तुमच्या चांगल्यासाठी होईल…!!!


बिरबल सापडला | Birbal Sapadla Akbar Birbalchya Chan Chan Goshti

Birbal Sapadla Akbar Birbalchya Chan Chan Goshti
Birbal Sapadla Akbar Birbalchya Chan Chan Goshti

एकदा, एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला.

परंतु, काही दिवसांतच अकबरला दरबारात बिरबलची अनुपस्थिती जाणवू लागली. वेळोवेळी अकबर बिरबलची आठवण काढत असे व चिंता करत असे. परंतु, बिरबलचा ठावठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलला परत आणण्यासाठी एक युक्ती बनवली.

त्याने पूर्ण राज्यात दवंडी पिटविली की, ‘जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार म्हणजेच जो व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत चालेल व जो अत्यंत उपाशी असेल अशा व्यक्तीला खूप मोठया रकमेचे बक्षिस दिले जाईल.’

हया दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबलपर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्या जवळ बोलवून राजदरबारात जाण्यास सांगितले. तसेच राजाच्या प्रश्नांना कशी उत्तरे दयावी तेही सांगितले.

बिरबलने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व बोलला, ‘ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाडयात जा. जाताना चुरमुरे खात खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दे.’

बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राजवाडयाकडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात चालला होता. अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. जेव्हा तो म्हणाला महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षिस घेण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर त्याला दरबारात सोडण्यात आले.

तो राजदरबारात त्याच पध्दतीने गेला. त्या मजेदार माणसाला बघून अकबर बोलला, ‘कोण आहेस तू?’

‘मी एक माणूस आहे.’ तो बोलला.

‘अच्छा! मग तू असा डोक्यावर खाट ठेऊन का आला आहेस?’ अकबरने विचारले.

तो बोलला, ‘महाराज! ही तुमचीच घोषणा आहे, की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षिस देणार आहात जो सावलीतही नाही व उन्हातही नाही. त्यामुळे मी ही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही व थेट सुर्यप्रकाशातही नाही.’

त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले. अकबर बोलला ‘हे काय आहे? तू राजदरबारात का खात आहे?’

तो म्हणाला, ‘महाराज! ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे. मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही कारण मी खूप भूकेलेला आहे.’

हे सर्व ऐकून अकबर कुतुहलाने बोलला, ‘सांग मला, तुला हे सर्व कोणी शिकविले?’

‘महाराज! काही महिन्यांपासून आमच्या गावात एक अनोळखी विव्दान व्यक्ती रहात आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी हे कार्य केले आहे.’ तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला.

अकबरला लगेच समजले की तो अनोळखी व्यक्ती कोण आहे ते. तो आनंदाने ओरडला, ‘मला बिरबल सापडला!’ त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते बक्षिस दिले. त्याने आपले काही दूत त्या गावात पाठविले व राजसन्मानाने बिरबलला परत आणले.


सगळे लोकं एकसारखाच विचार करतात | Akbar and Birbal Stories Collection in Marathi

Akbar and Birbal Stories Collection in Marathi
Akbar and Birbal Stories Collection in Marathi

दरबाराचे कामकाज चालू होते. राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टिने महत्वाचे काय या एका  प्रश्नावर सर्वजण चर्चा करत होते . सर्वजण एक एक करून आपले मत व्यक्त करत होते. अकबर दरबारात बसून हे सर्व ऐकत होता व त्याला असे जाणवले की सर्वांचे म्हणणे वेगवेगळे आहे. त्यांना आश्चर्य वाटले की सर्व एकसारखेच विचार का करत नाही!

अकबरने बिरबलला विचारले, ‘तू मला सांगू शकतो का, की लोकांमधील प्रत्येकाचे मत आपापसात का मिळत नाही? सगळे वेगवेगळया पध्दतीने विचार का करतात?’

‘प्रत्येक वेळेस असे होत नाही, महाराज!’ बिरबल बोलला, ‘काही समस्या अशा असतात की ज्यावर सर्व एकसारखे विचार करतात.’ यानंतर कामे आटोपून दरबारातील कार्यवाही समाप्त झाली व सगळे आपापल्या घरी निघून गेले.

त्या संध्याकाळी अकबर आणि बिरबल बागेत फिरत होते, तेव्हा अकबरने पुन्हा सकाळचा प्रश्न बिरबलला केला व त्याबद्दल निरसन करायला सांगितले. त्यानंतर बिरबलने बागेत एका कोपऱ्यात बोट करून सांगितले की , ‘त्या तिथे झाडाजवळ एक विहीर आहे तिथे चला, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा लोकांशी निगडीत काही समस्या असतात तेव्हा सर्वजण एकसारखाच विचार करतात. माझे म्हणणे असे आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यावर लोकांचे विचार एकसारखेच असतात.’

अकबरने विहीरीजवळ काहीवेळ बघितले व बोलला, ‘परंतु मला काहीही समजले नाही, तुझी समजवण्याची पध्दत जरा वेगळीच आहे.’ अकबरलाही माहीत होते की बिरबल आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी असेच काहीतरी प्रयोग करत असतो.

‘सर्व काही समजेल महाराज!’ बिरबल बोलला.‘आपण राजकीय आदेश जाहीर करा की येत्या पौर्णिमेला राज्यातील प्रत्येक घरातून एक तांब्या दूध बागेत असलेल्या विहीरीत आणून टाकले जावे. आपले राज्य खूप मोठे आहे, जर प्रत्येक घरातून एक तांब्या दूध या विहीरीत पडले तर ही विहीर दूधाने भरून जाईल.’

बिरबलचे हे बोलणे ऐकून बादशहा अकबर जोरजोरात हसू लागला. तरीपण त्याने बिरबलने सांगितल्याप्रमाणे राजआदेश काढला. पूर्ण राज्यात दवंडी पिटवली गेली की, ‘येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक तांब्या दूध शाही बागेतील विहीरीत आणून टाकावे. जो असे करणार नाही त्याला शिक्षा दिली जाईल.’

पौर्णिमेच्या दिवशी बागेच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवले गेले की प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती आलेली आहे. सर्वांच्या हातात भरलेले भांडे दिसत होते.

अकबर आणि बिरबल लांब बसून हे सर्व काही बघत होते आणि एकमेकांकडे बघून हसत होते. संध्याकाळ होण्याच्या आधी विहीरीमध्ये दूध टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. प्रत्येक घरातून दूध आणून विहीरीत टाकले गेले होते.

जेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले तेव्हा अकबर व बिरबल दोघेही विहीरीजवळ गेले व विहीरीमध्ये त्यांनी डोकवून बघितले. विहीर काठोकाठ भरलेली होती. परंतु विहीर दूधाच्या ऐवजी पाण्याने भरलेली होती हे बघून अकबर चकित झाला.

हैराण झालेल्या नजरेने अकबरने बिरबलकडे बघत विचारले, ‘असे का झाले? शाही आदेश तर विहीरीत दूध टाकण्याचा निघाला होता, परंतु हे पाणी कुठुन आले? लोकांनी दूध का नाही टाकले?’ बिरबल जोरात हसून बोलला, ‘हेच मला सिध्द करायचे होते महाराज! मी तुम्हाला सांगितले होते ना की बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यावर लोक एकसारखा विचार करतात. हे पण त्याचेच एक उदाहरण होते. लोक बहुमूल्य दूध वाया घालवायला तयार नव्हते त्यांना माहीत होते की विहीरीत दूध टाकणे व्यर्थ आहे त्यामुळे त्यातून त्यांना काही मिळणार नाही. त्यामुळे विहीरीत दूधाऐवजी पाणी टाकले तर कोणालाही समजणार नाही असा विचार त्यांनी केला व सर्वांनी दूधाऐवजी पाणीच विहीरीत ओतले. याचा परिणाम दूधाच्या ऐवजी विहीर पाण्याने भरली.’

बिरबलची चतुराई बघून अकबरने त्याची पाठ थोपटली. बिरबलने सिध्द करून दाखविले की कधी कधी लोकं एकसारखाच विचार करतात. 🙂


सर्वात मोठे शस्त्र | Sarvat Mothe Shastra Akbar Birbal katha

Sarvat Mothe Shastra Akbar Birbal katha
Sarvat Mothe Shastra Akbar Birbal katha

बादशहा अकबर आणि बिरबल मध्ये कधी कधी अशा गोष्टींवरही चर्चा होत असे की ज्याची कसोटी घेताना जिवाचा धोका उद्भवत असे. एकदा अकबरने बिरबलला विचारले – ‘बिरबल, जीवनामध्ये सर्वात मोठे शस्त्र कोणते आहे?’

‘महाराज जीवनात सर्वात मोठे शस्त्र हे आत्मविश्वास आहे.’ बिरबलने उत्तर दिले.

अकबरने बिरबलचे हे उत्तर ऐकून ते आपल्या मनात ठेवले व एखादया वेळी आपण याची परीक्षा घेऊ असे ठरविले.
एक दिवशी, एक हत्ती वेडा झाला. अशा स्थितीत त्या हत्तीला बेडयांमध्ये अडकवून ठेवले जात असे.
अकबरने बिरबलच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलवणे पाठवले व इकडे हत्तीच्या महावताला आदेश दिला की जसा बिरबल येताना दिसेल, तसा तू या हत्तीच्या बेडया काढून टाक.

बिरबलला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती. जेव्हा बिरबल अकबरला भेटण्यासाठी दरबाराकडे जात होता तेव्हा त्याच्या दिशेने तो वेडा झालेला हत्ती सोडला गेला. बिरबल आपल्या स्वतःच्याच धुंदीत चालत होता की त्याची नजर त्या वेडया हत्तीकडे गेली जो उडया मारत त्याच्याकडे येत होता.

बिरबल हजर जबाबी, अतिशय बुध्दिमान, चतुर व आत्मविश्वासी होता. त्याला लगेच लक्षात आले की अकबरने माझ्या आत्मविश्वासाची व बुध्दिची परीक्षा घेण्यासाठी त्या वेडया हत्तीला माझ्यावर सोडले आहे.

तो हत्ती सोंड वर करून खूप जोरात बिरबलच्या दिशेने पळत येत होता. बिरबल अशा ठिकाणी उभा होता की तो इकडे तिकडे पळून सुध्दा वाचणे शक्य नव्हते. त्याच वेळेला बिरबलला एक कुत्रा दिसला. हत्ती खूप जवळ आला होता. तो इतक्या जवळ होता की कोणत्याही क्षणी बिरबलला आपल्या सोंडेत पकडले असते.

तेव्हा बिरबलने तात्काळ त्या कुत्र्याचे मागचे दोन पाय पकडले आणि पूर्ण ताकदीने त्याला फिरवून हत्तीच्या दिशेने फेकले. अत्यंत घाबरलेला व ओरडत असलेला कुत्रा जेव्हा हत्तीवर जाऊन आपटला तेव्हा त्याचे ते भयानाक किंचाळणे व ओरडणे ऐकून हत्ती पण घाबरला व वळून दुसऱ्या दिशेला पळाला.

अकबरला जेव्हा बिरबलने केलेल्या या कृत्याची बातमी मिळाली तेव्हा अकबरला मानावेच लागले की बिरबल जे काही बोलला ते अगदी योग्य आहे. आत्मविश्वासच सर्वात मोठे शस्त्र आहे. 🙂


मुलाचे हट्ट श्रेष्ठ । Mulancha Hatt Sheshtha Akbar Birbal Marathi Goshti

एकदा काय झाले बिरबलाला दरबारामध्ये यायला उशीर झाला. बिरबल दरबारामध्ये आल्यानंतर अकबर बादशहाने त्याला विचारले बिरबल तू तर इतका शिस्तीचा आज तुला उशीर कसा काय झाला दरबारामध्ये यायला?

तेव्हा बिरबल म्हणाला. खाविंद, काय करू माझा मुलगा हट्टच धरून बसला, काहीही केलं तरी मला सोडायलाच तयात होईना. कशी तरी त्याची समजूत काढून धावत दौडत इथे आलो आहे. आता तुम्हाला काय सांगणार मुलाचा हट्ट.

त्यावर अकबर बादशहा हसला आणि म्हणाला बिरबल स्वतःला तू तर इतका हुशार समजतोस मग सध्या छोट्या मुलाची समजूत काढता नाही का येत तुला? यावर बिरबल म्हणाला तुम्ही समजता इतके सोपे इतके काम नाही आहे हे. मुलाची समजूत काढणं महा कर्म कठीण. पण बादशहा हे मानायलाच तयार न्हवता. तेव्हा बिरबल, बादशहाला म्हणाला. खाविंद, आपण एक काम करूया. पुढच्या काही घटकांसाठी तुम्ही व्हा माझे वडील व मी होतो तुमचा मूलगा आणि आपण खोटं खोटं च नाटक करू आणि मी काही तरी हट्ट करेन आणि तुम्ही माझा हट्ट पुरवा. एक मात्र अट आहे मला मारायचे नाही किव्हा मारायची धमकी सुद्धा द्यायची नाही आहे का मंजूर?

अकबर म्हणाला, फारच सोपी गोष्ट आहे. अशा रीतीने त्यांचं ते नाटक सुरु झाले.

नाटक सुरु होताच बिरबल मोठे भोकाड पसरून खाली बसला आणि अगदी लहान मुलांसारखे रडायला लागला …. आणि रडत रडत म्हणाला मला आताच्या आता ऊस पाहिजे. त्यावर बादशहा ने बाजासिंगला ऊस आणायला सांगितले. बाजासिंग धावत धावत गेला आणि एक मोठा ऊस घेऊन आला. तो ऊस बिरबलाला म्हणजे त्या मुलाला देऊन बादशहा म्हणाला हा घे ऊस आता बस तो कुरतडत दिवसभर. त्यावर बिरबलाने पुन्हा भोकाड पसरले व बोलला मला नको पूर्ण ऊस, मला नको पूर्ण ऊस, मला त्याचे तुकडे करून द्या. बादशहा म्हणाला खंडोजी या उसाचे तुकडे कर आणि लगेच या मुलाला दे.

लगेच मग त्या नोकराने त्या उसाचे तुकडे केले आणि ते तुकडे छोट्या मुलाच्या म्हणजे बिरबलाच्या समोर आणले. पण त्या उसाचे तुकडे पाहून बिरबलाने पुन्हा भोकाड पसरले आणि बोलू लागला मला तुकडे नको मला पूर्ण ऊस पाहिजे. आता मात्र बादशहाला राग यायला लागला आणि म्हणाला अरे आता तर तू उसाचे तुकडे करायला सांगितलेस आणि पुन्हा आता तुला ऊस हवाय? हे नक्की काय चालाय तुझं. हे ऐकून बिरबल अजून जोराने रडू लागला आणि म्हणाला तुम्ही माझ्यावर रागावलात. मला ऊस च पाहिजे मला पूर्ण च ऊस पाहिजे. बादशहा आता मात्र मेटाकुटीला आला होता त्याने पुन्हा बाजासिंग ला बोलावले. जा रे बाजासिंग, अजून एक आख्खा ऊस घेऊन ये याच्या साठी. झालं, ते वाक्य ऐकले ना ऐकलेच तेवढ्यात बिरबल पुन्हा रडू लागला. मला दुसरा ऊस नको मला हेच तुकडे जोडून त्याचा पूर्ण ऊस करून द्या. आता मात्र अकबराचा तोल सुटला आणि म्हणाला अरे काय चालवले आहेस बिरबल. पहिले अखंड उसाचे तुकडे करायला सांगतोस मग पुन्हा त्या तुकड्यांचे अखंड ऊस करायला सांगतोस. काय आहे कि नाही तुला आता जर गप्प नाही बसलास तर तुला चांगलाच मार देईन.

हे शब्द ऐकले आणि बिरबल उभा राहिला आणि म्हणाला बघितलात खाविंद तुम्ही अगदी दोन घटकताच मुलाला मारायला उठलात आणि मुलाला मारायचे नाही असे आपले ठरले होते. आता तुम्हाला समजले का लहान मुलाची समजूत काढणे किती कठीण आहे.

या सगळ्या प्रकाराने बादशहा इतका मेटाकुटीला आला होता कि त्याने लगेच बिरबलाचे म्हणणे मान्य केले आणि म्हणाला हो रे बाबा बिरबल आता मला कळले कि होत लहान मुलाची समजून काढणे म्हणजे. चाल हरकत नाही आज तू उशिरा आलास चल आता आपल्या दरबाराचे काम सुरु कर.

अशा रीतीने बिरबलाने आपले बोलण बादशहाला पटवून दिले.


सर्वोत्तम पाणी | Sarvottam Pani Akbar birbal Marathi Katha

Sarvottam Pani Akbar birbal Marathi Katha
Sarvottam Pani Akbar birbal Marathi Katha

एक दिवस, अकबरने सर्व दरबाऱ्यांना एक प्रश्न विचारला – ‘कोणत्या नदीचे पाणी हे सर्वात उत्तम आहे?’

दरबारातील जास्तीत जास्त लोकांनी एकमताने उत्तर दिले, ‘महाराज! इतर सर्व नदयांच्या पाण्याच्या तुलनेत गंगा नदीचे पाणी हे सर्वोत्तम पाणी आहे.’

परंतु बिरबल शांत होता. हे अकबरने बघितले आणि विचारले, ‘तू शांत का बसला आहे बिरबल? तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.’

बिरबल बोलला, ‘महाराज सर्व नदयांमध्ये यमुना नदीचे पाणी सर्वोत्तम आहे.’

बिरबलचे हे उत्तर ऐकून अकबर चकित झाला. तो बोलला, ‘बिरबल हे तू काय बोलतो आहे? तुमच्या धार्मिक पुस्तकात गंगा नदी ही शुध्द व पवित्र म्हटले आहे, आणि तू यमुनेचे पाणी उत्तम म्हणत आहेस!’

बिरबल म्हणाला, ‘महाराज! मी गंगा नदीच्या पाण्याला अमृत मानतो. त्यामुळे तुम्ही कृपया इतर कोणत्याही पाण्याबरोबर त्याची तुलना करू नका. ते तर अमृत आहे. राहिला प्रश्न नदीच्या पाण्याचा, तर आपल्या राज्याची यमुना नदीच स्वच्छ आहे व त्याचेच पाणी सर्वोत्तम आहे.’

सर्व दरबारी व अकबर अनुत्तरीत झाले व बिरबलच्या उत्तराशी सहमत झाले. 🙂

Please Note

Akbar Birbal Stories With Moral in Marathi वर गोष्टी वाचायची मजा हि वेगळीच असते कारण या गोष्टींची मजा लहानांपासून मोठे देखील घेतात कारण या गोष्टींमधून भरपूर शिकायला भेटते. Akbar Birbal story in marathi या लेखात दिलेल्या ३० कथांपैकी तुम्हाला कोणती कथा आवडती ती कंमेंट करून नक्की सांगा.

लक्ष द्या: Akbar Birbal story in marathi वर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुम्हाला या लेखामध्ये काही चुकीचे वाटत असेल तर कंमेंट मध्ये नोंद करा कारण आम्ही वेळोवेळी हा लेख update करतो.

FAQ

प्रश्नः अकबरचा जन्म कधी झाला?

उत्तरः अकबरचा जन्म 15 ऑक्टोबर 1542 रोजी झाला.

प्रश्नः बिरबलचा जन्म कधी झाला?

उत्तरः बिरबलचा जन्म 1528 रोजी झाला.

हे देखील वाचा:

Ghost story in Marathi

Moral Stories for Kids

५८+ Easy Marathi Nibandh 

 

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

10 thoughts on “30+ Akbar Birbal story in Marathi | Marathi Goshti Akbar Birbal 2024”

Leave a Comment