Amazon vs Flipkart comparison in Marathi 2025

Amazon vs Flipkart comparison in Marathi

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म मध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन वेबसाईट खूप जास्त पॉप्युलर आहेत. आपण या प्लॅटफॉर्म वरून विविध प्रकारचे प्रोडक्ट खरेदी करू शकतो. आज आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन पैकी एक वेबसाईट ही आंतरराष्ट्रीय असून दुसरी वेबसाईट ही भारतीय आहे.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही वेबसाईट वर आपल्याला अनेक उत्पादने ही ऑफर्स आणि डिस्काउंट सोबत खरेदी करता येतात. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी केले जाणारे प्रॉडक्ट्स हे खूप जलद वेगाने ग्राहकांच्या पर्यंत पोहोचविले जातात. या दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये काही प्रमाणात फरक आहेत आणि ते आपण आज जाणून घेणार आहोत.

अमेझॉन काय आहे?

अमेझॉन ही एक अमेरिकन कंपनी असून ही संपूर्ण जगभरात कार्यात आहे. अमेझॉन कंपनीचा इतिहास बघितला तर 1994 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. जेफ बेजोस यांनी अमेझॉन कंपनीची स्थापना केली. कंपनीचा इतिहास हा पुस्तक विक्री पासून सुरू झालेला आहे. आजच्या घडीला अमेझॉन कंपनी मार्फत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, घरघुती साहित्य आणि जवळपास सर्व काही विक्रीस उपलब्ध करून दिलेले आहे.

अमेझॉन प्लॅटफॉर्म आंतरराष्ट्रीय जरी असेल तरी देखील सर्व देशांमध्ये गरजेनुसार जे प्रोडक्ट हवे आहेत त्यांची विक्री केली जाते. अमेझॉन विविध सणांना त्यांच्या वेबसाईट वरून आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करत असते. अमेझॉन कडून वेगवान डिलिव्हरी देण्यासाठी अथक परिश्रम केले जातात.

फ्लिपकार्ट काय आहे?

फ्लिपकार्ट ही अमेझॉन सारख्या कंपनी ला बघून सुरू झालेली एक भारतीय कंपनी आहे. 2007 मध्ये भारतात फ्लिपकार्ट या कंपनीची सुरुवात झाली. जवळपास अमेझॉन कंपनीच्या 13 वर्षानंतर भारतात आलेल्या फ्लिपकार्ट ची स्थापना सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी केली होती. काही वर्षांपासून ही कंपनी आता आंतरराष्ट्रीय कंपनी वॉलमार्ट अंतर्गत कार्यरत आहे.

जवळपास सर्वच श्रेणी मध्ये फ्लिपकार्ट ने भारतात विक्री सुरू केली. भारतात सर्वात जास्त वेगाने लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे फ्लिपकार्ट ने सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक उत्पादने खूप स्वस्त दरात ऑफर सोबत विक्री केली. त्याचा फायदा त्यांना भारतीय मार्केट मध्ये लवकर स्थान निर्माण करण्यासाठी झाला. फ्लिपकार्ट वर सध्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, कपडे, घरघुटी सामना, फर्निचर, पुस्तके आणि गरजेनुसार सर्वच वास्तू विक्री साठी उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्ट विरुद्ध अमेझॉन : मार्केट शेअर

मागील काही वर्षांच्या ई कॉमर्स मार्केट शेअर अनुसार फ्लिपकार्ट कंपनीचा मार्केट शेअर हा 48% असून अमेझॉन कंपनीचा मार्केट शेअर हा 26% आहे. मार्केट शेअर मध्ये सण उत्सव काळात बडल होत असतात. अमेझॉन प्लॅटफॉर्म वर मागील काही दिवसांमध्ये सेल दरम्यान जास्तीत जास्त खरेदी होत असते.

भारतातील मार्केट शेअर मध्ये आजही फ्लिपकार्ट च्या वेबसाईट आणि मोबाईल ॲप मधील चांगल्या अनुभवामुळे फ्लिपकार्ट हे अमेझॉन पेक्षा जास्त वापरले जाते. त्यामुळे अमेझॉन पेक्षा फ्लिपकार्ट जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे.

फ्लिपकार्ट विरुद्ध अमेझॉन : फेस्टीव्हल सेल

दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मध्ये सणांच्या काळात भारतात काही स्पेशल सेल सुरू करता. या सेल्स मध्ये अधिकाधिक ऑफर्स मुळे या प्लॅटफॉर्म वरून खूप जास्त विक्री होत असते.

फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला बिग बिलियन डे सेल बघायला मिळतो. अमेझॉन मध्ये सणांच्या काळात ग्रेट इंडीयन फेस्टीव्हल हा सेल सुरू असतो. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये सुरू असलेल्या ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सारख्या सेल्स वरून हे ऑफर सेल भारतात सुरू केले आहे.

फेस्टीव्हल सेल्स दरम्यान भारतात सर्वाधिक लोक शॉपिंग करतात आणि याचाच फायदा या प्लॅटफॉर्म ने घेतला आहे. आकर्षक कधी न मिळणारा डिस्काउंट आणि किंमत या दरम्यान दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म देतात.

याशिवाय अमेझॉन वर दिवाळी सेल, ख्रिसमस सेल सारखे विविध सेल्स असतात. यामध्ये मधील काळात लायटनिंग डील आणि डील ऑफ द डे सारख्या गोष्टी बघायला भेटतात.

फ्लिपकार्ट वर देखील दिवाळी, ख्रिसमस सेल सोबत ईयर एंड सेल, इंडिपेंडंस डे सेल सारखे अनेक सेल सुरू असतात. फ्लिपकार्ट कडून एक्सक्ल्युझिव्ह डिस्काउंट ऑफर कायम सुरू असतात.

अमेझॉन विरुद्ध फ्लिपकार्ट : प्रीमियम प्लॅन

अमेझॉन कडून प्रीमियम फीचर्स लाभ घेण्यासाठी प्राईम मेंबरशिप घ्यावी लागते. अमेझॉन ची प्राईम मेंबरशीप ही प्रती महिना 299 रुपये किमतीत आहे. यामध्ये इतर ऑप्शन हे 3 महिन्याचा पॅक 599 रुपये, वार्षिक पॅक 1499 रुपये आहेत. अमेझॉन प्राईम शॉपिंग एडिशन ही 12 महिन्यांसाठी तुम्हाला 399 रुपये किमतीत मिळते. आपल्याला शॉपिंग साठी फक्त या शेवटच्या पॅक ची गरज असते. बाकी पॅक मध्ये तुम्हाला अमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्म चा वापर करता येतो.

फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला प्रीमियम गोष्टींचा लाभ घेण्यासाठी फ्लिपकार्ट प्लस किंवा फ्लिपकार्ट व्हीआयपी घ्यावी लागते. या पॅक तुम्ही तुमच्या जुन्या शॉपिंग मधून मिळणाऱ्या फ्लिपकार्ट कॉइन मधून देखील घेऊ शकतात. फ्लिपकार्ट चा वार्षिक व्हीआयपी पॅक हा 49o रुपये किमतीचा आहे.

अमेझॉन विरुद्ध फ्लिपकार्ट : वस्तूंच्या किमती

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला किंमतीत स्पर्धा सुरू असलेली दिसेल. अमेझॉन वर आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये असल्याने आणि विक्रेत्याकडून जास्त चार्ज घेतला जात असल्याने थोडी किंमत ही फ्लिपकार्ट पेक्षा जास्त असते. मात्र काही विक्रेते हे अमेझॉन सोबत जोडून कमीत कमी किंमतीत विक्री करतात.

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सोबत विक्रेते जोडले गेले आहेत. त्या विक्रेत्यानुसर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म वर जास्तीत जास्त डिस्काउंट मिळू शकतो.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट मध्ये सारख्या गोष्टी काय आहेत?

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे दोन्ही प्लॅटफॉर्म विश्वासार्ह आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सुरक्षित पेमेंट गेटवे आहेत. त्यासोबत दोन्ही प्लॅटफॉर्म हे तुम्हाला सुरक्षित आणि वेगवान डिलिव्हरी देतात.

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही प्लॅटफॉर्मचा युजर इंटर्फेस हा सहज नवीन वापरकर्त्याला समजेल असाच आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट चे मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. जवळपास प्रत्येक ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये हे ॲप असतात. सोशल मीडिया वर या प्लॅटफॉर्म च्या जाहिराती देखील अगदी मोक्याच्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि आपण सहजपणे त्यांना भुरळून त्या वस्तू खरेदी करण्यासाठी इच्छुक होतो.

FAQ

Q. फ्लिपकार्ट ची स्थापना कोणी केली?

फ्लिपकार्ट ची स्थापना बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल या दोन भावांनी मिळून केली होती.

Q. अमेझॉन ई कॉमर्सची स्थापना कोणी केली?

अमेझॉन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ची स्थापना ही जेफ बेझोस यांनी केली.

Q. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन पैकी कोणती कंपनी मोठी आहे?

अमेझॉन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात मोठी तर भारतात फ्लिपकार्ट ही सर्वात मोठी कंपनी आहे.

Q. फ्लिपकार्ट ही कंपनी सध्या कोणत्या कंपनी अंतर्गत कार्य करते?

आंतरराष्ट्रीय कंपनी वॉलमार्ट च्या अंतर्गत फ्लिपकार्ट ही कंपनी कार्य करते.

Also Read

Samsung vs Apple Comparison in Marathi

Leave a Comment