आमचा राजू का रुसला | Amcha Raju Ka Rusala Marathi Lyrics

आमचा राजू का रुसला | Amcha Raju Ka Rusala Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – जयवंत कुलकर्णी
चित्रपट – अनोळखी


Amcha Raju Ka Rusala Marathi Lyrics

रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू
हाहा.. ही ही.. हो हो
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला ?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?

गाल गोबरे गोरे गोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला ?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला ?

बावन पत्ते बांधु वाडा, शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला ?

चिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला ?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला ?

Leave a Comment

x