समान संबंध ओळखा | Analogy test in Marathi
Q. बॉटनी : वनस्पती : : एन्टोमॉलॉजी : ?
A. साप
B. कीटक
C. पक्षी
D. रोगजंतू
उत्तर: बॉटनी मध्ये वनस्पतींचा अभ्यास करतात, तर एन्टोमॉलॉजी मध्ये कीटकांचा अभ्यास करतात.
Q. ससा : प्राणी : : ? : ?
A. सूर्य : चंद्र
B. पंचकोन : आकृती
C. सिंह : पक्षी
D. प्राणी : गाय
उत्तर: अगोदर घटक व नंतर तो घटक ज्याचा भाग आहे तो गट दिलेला आहे. जसे ससा हा प्राणी या गटात मोडतो, तसेच पंचकोन हा ‘आकृती’ या गटात मोडतो.
Q. डॉक्टर : रुग्ण : : राजकारणी : ?
A. लोक
B. मतदार
C. सत्ता
D. खुर्ची
उत्तर: डॉक्टरांचा संबंध रुग्णाशी असतो. तर राजकारण्यांचा संबंध लोकांशी असतो.
Q. सैन्य : सैनिक : : ? : ?
A. कलापथक: कलाकार
B. प्राचार्य : शाळा
C. चाक कार
D. मंत्री मंत्रीमंडळ
उत्तर: येथे सुरूवातीस गट व नंतर त्या गटाचा एक घटक दिलेला आहे.
Q. खालीलपैकी विसंगत जोडी शोधा.
इराण: आशिया, कैनबेरा : ऑस्ट्रेलिया, नॉर्वे : युरोप, अल्जेरिया: आफ्रिका
A. इराणःआशिया
B. कॅनबेरा ऑस्ट्रेलिया
C. नॉर्वे युरोप
D. यापैकी नाही
उत्तर: इराण हा आशिया खंडामधील देश आहे. व नॉर्वे हा युरोप खंडामधला देश आहे. परंतु कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे म्हणून ते विसंगत घटक होईल.
Q. अर्क : सहस्रकर : : तीर : ?
A. धनुष्य
B. शरण
C. बाण
D. इंद्रधनुष्य
उत्तर: ‘अर्क’ या शब्दाचा समानार्थी शब्द ‘सहस्रकर’ आहे, त्याप्रमाणे ‘तीर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ‘बाण’ आहे.
Q. आर्मी : जनरल : : नौसेना : ?
A. जनरल
B. कर्नल
C. एडमिरल
D. ऑफीसर
उत्तर: आर्मीच्या प्रमुखास जनरल म्हणतात. तर नौसेनेच्या प्रमुखास एडमिरल म्हणतात,
Q. ब्राझील : ब्राझीलिया : : पेरू 😕
A. लिमा
2 लपाझ
C. क्विटो
D. सैटिआगो
उत्तर: ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया, तसे ‘पेरू या देशाची राजधानी लिमा.
Q. मनुष्य : नाक : झाड?
A. पान
B. फुल
C. फळ
D. मूळ
उत्तर: मनुष्य हा नाकावाटे श्वासोश्वास करतो, तर झाड है पानाद्वारे करते.
Q. वि. स. खांडेकर : ययाती : : विश्वास पाटील : ?
A. मृत्यूंजय
B. श्रीमान योगी
C. छावा
D. झाडाझडती
उत्तर: ‘ययाती’ ही कादंबरी वि. सा. खांडेकरांनी लिहीली आहे. त्याचप्रमाणे ‘झाडाझडती’ ही कादंबरी विश्वास पाटलांनी लिहीली आहे.
Q. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा उचित शब्द पर्यायातून निवडा.
गाय – दूध | मधमाशी – मध | शिक्षक – ?
A. गुण
B. शिस्त
C. ज्ञान
D. धडा
उत्तर: सुरूवातीस सजीव घटक व त्यापुढे त्याचे मुख्य उत्पादन/निष्पत्ती दिली आहे. शिक्षकाचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हे आहे.
Q. लेफ्टनंट : कैप्टन : : कर्नल : ?
A. मेजर
B. ब्रिगेडीयर
C. कमांडर
D. जनरल
उत्तर: लेफ्टनंट -> कैंटन | कर्नल -> ब्रिगेडीयर
Q. विजय तेंडुलकर: फुलपाखरू : : मोरपिसे ?
A. अरविंद गोखले
B. अण्णाभाऊ साठे
C. अनंत काणेकर
D. आचार्य अत्रे
उत्तर: फुलपाखरू’ या कथेचे लेखक विजय तेंडुलकर हे आहेत. तसेच ‘मोरपिसे’ या कथेचे लेखक अनंत काणेकर हे आहेत.
Q. समसंबंध ओळखा. मंगळवार : शनिवार : : चैत्र : ?
A. वैशाख
B. जेष्ठ
३) श्रावण
D. भाद्रपद
उत्तर: जसे की मंगळवार नंतर 4 थ्या दिवशी शनिवार येतो, तसेच मराठी महिना चैत्र नंतर 4 था श्रावण येतो.
Q. राज्यशास्त्रचा संबंध सामाजिक शास्त्राशी, तर रसायनशास्त्रचा संबंध कशाशी?
A. मानव्यविद्या
B. अभिक्रिया
C. मूलद्रव्ये
D. विज्ञान
उत्तर: राज्यशास्त्र’ ही सामाजिक शास्त्राची एक शाखा आहे, त्याचप्रमाणे ‘रसायनशात्र’ ही ‘विज्ञाना’ ची (science) एक शाखा आहे.
Q. संबंध ओळखा. मुस्लिम : मशीद : : शिख : ?
A. सुवर्ण मंदीर
B. देऊळ
C. अग्नीहोत्र
D. गुरुद्वारा
उत्तर: मुस्लिांचे प्रार्थना स्थळ मशीद असते. सेच शिखांचे गुरुद्वारा असतो
Q. श्वसन संस्था : फुप्फुस : : रक्ताभिसरण संस्था : ?
A. रक्त
B. रक्ताभिसरण
C. हृदय
D. निला
उत्तर: श्वसनसंस्था : फुफ्फुस : : रक्ताभिसरण संस्था : हृदय
Q. पहिल्या दोन पदांमधील संबंध ओळखून गाळलेले तिसरे पद निश्चित करा.
बांबू : काठी : : ? : सुई
A. दाभण
B. खिळा
C. टोचा
D. टाचणी
उत्तर: बांबु: काठी: दाभण: सुई.
Q. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
चोर : टोळी : : खेळाडू : ?
A. घोळका
B. संघ
C. जया
D. मंडळ
उत्तर: चोरांची टोळी असते. त्याचप्रमाणे खेळाडूंचा संघ असतो.
Q. फुल : पाकळ्या : : शब्द : ?
A. वाक्ये
B. अक्षरे
C. परिच्छेद
D. विरामचिन्हे
उत्तर: पाकळ्यापासुन फुल बनते तर अक्षरांपासुन शब्द