असेच होते म्हणायचे तर | Asech Hote Mhanayche Tar Marathi Lyrics

असेच होते म्हणायचे तर | Asech Hote Mhanayche Tar Marathi Lyrics

गीत – विंदा करंदीकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – सुधीर फडके


असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का ?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का ?

असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलिस का ?
स्वप्‍नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसलिस का ?

असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का ?
भरात येऊन भलत्यासलत्या करांत माझ्या शिरलिस का ?

असेच होते म्हणायचे तर अशी जिवाला डसलिस का ?
केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलिस का ?

Leave a Comment