अशीच साथ राहू दे | Ashich Sath Rahu de Marathi Lyrics

अशीच साथ राहू दे | Ashich Sath Rahu de Marathi Lyrics

गीत -शांताराम नांदगावकर
संगीत – अरुण पौडवाल
स्वर- अनुराधा पौडवाल ,  सुरेश वाडकर


अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची
अशीच रात राहू दे प्रसन्‍न चांदण्याची

अशा युगात लाभल्या सुखावल्या क्षणात
मिटुन लोचले तुला मिठीत, सावलीत
तार छेडिता स्वरात रास चुंबनांची

स्पर्श स्पर्श वेचिते तुझाच चंदनाचा
मोहरे मनात गंध प्रीत बंधनाचा
मी जपून ठेवते स्मृती अशा सुखाची

यापुढे कधीच दूर जाऊ तू नकोस
घे मिटुन काळजात या मुक्या कळीस
ही ऋणानुबंधने अशी युगायुगांची

Leave a Comment