आवडतो मज आवडतो | Avadto Maz Avadto Marathi Lyrics

आवडतो मज आवडतो | Avadto Maz Avadto Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – अपर्णा मयेकर
चित्रपट – शेवटचा मालुसरा


आवडतो मज आवडतो, मनापासुनी आवडतो

सहवास लागता गोड
का मला लागते ओढ
मज दर्शन होता त्याचे
मन वेडे होऊन नाचे
मळ्यात राही कधीतरी अन्‌ तो तळ्यात केव्हा सापडतो

कधी थकुनी त्याने यावे
मी हळूच कुरवाळावे
कधी येता त्याला रंग
अंगास घासतो अंग
दोस्त जिवाचा, चिंगलिंग चाचा, बैल लाडका आवडतो

Leave a Comment