बाळ गुणी तू कर अंगाई | Baal Guni Tu Kar Angai Marathi Lyrics

बाळ गुणी तू कर अंगाई | Baal Guni Tu Kar Angai Marathi Lyrics

गीत – शान्‍ता शेळके
संगीत – राम कदम
स्वर – सुधीर फडके ,  सुमन कल्याणपूर
चित्रपट – भाग्यलक्ष्मी


बाळ गुणी तू कर अंगाई
जोजविते रे, तुजला आई !

तुझा चंदनी लाल पाळणा
जाईजुईचा मऊ बिछाना

झुलती वरती राघूमैना
मागेपुढती झोका जाई

निजले तारे, निजले वारे
शांत झोपली रानपाखरे

जग भवतीचे निजले सारे
चंद्रहि करितो गाई गाई

मंद पाऊली येते रजनी
शिणले डोळे जागजागुनी

अजुनी मिटेना कशी पापणी ?
नीज लडिवाळा, नीज लवलाही

Leave a Comment

x