बाळ जा मज बोलवेना | Baal Ja Maz Bolavena Marathi Lyrics

बाळ जा मज बोलवेना | Baal Ja Maz Bolavena Marathi Lyrics

गीत – वंदना विटणकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – सुधीर फडके
नाटक – आसावरी


बाळ जा ! मज बोलवेना ! दाटला आता गळा
तू रहा सौख्यात बाळे ! अश्रु ढाळू दे मला

मीच कन्‍यादान केले करुनि मोठा सोहळा
सासरी निघता परि तू, ऊर माझा भंगला
ना कुणा कळतील माझ्या वेदनेच्या या कळा

पूस डोळे ! बंध तुटले येथले सारे अता
राहु दे वैराण गेही यापुढे मज एकटा
हो सदा सौभाग्यलक्ष्मी ! पुण्य माझे घे तुला

Leave a Comment

x