बैल आणि बोकड | Bail aani Bokad Marathi Katha
Bail aani Bokad Marathi Katha: सिंह मागे लागला म्हणून एक बैल जीव घेऊन पळाला. तो गुहेत शिरत असता तेथे एक बोकड होता, तो त्याला आत येऊ देईना. तो म्हणाला, ‘अरे माझ्या पाठीमागे सिंह लागला आहे. या वेळी मला आश्रय देणं तुझ्या गृहस्थीपणाला योग्य आहे.’ बोकड काही ऐकेना, तो शिंगे उभारून त्याच्या अंगावर धावू लागला. तेव्हा बैल त्याला म्हणाला, ‘अरे, मी तुला भीत नाही, पण काय करू ? मी संकटात सापडलो आहे. जर यावेळी माझ्या मागे सिंह नसता तर बैल व बोकड यांच्या योग्यतेमध्ये किती अंतर आहे, याचा प्रत्यय तुला आताच दाखवला असता’.
तात्पर्य
– संकटात सापडलेल्याला योग्य ती मदत न करणे हा दुष्टपणा होय.
मित्रांनो तुम्हाला Bail aani Bokad Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.