बैल तुझे हरणावाणी | Bail Tuze He Harnavani Marathi Lyrics

बैल तुझे हरणावाणी | Bail Tuze He Harnavani Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – प्रपंच


Bail Tuze He Harnavani Marathi Lyrics

बैल तुझे हरणावाणी गाडीवान दादा
तरूण माणसाच्या मनीचा जाण तू इरादा

वाट नागमोडी वेडी, तुझी फुलोर्‍याची जोडी
ऊन सावल्यांचा झाला आगळा कशिदा

गाव साजणीचा दूर, शहारून येतो ऊर
सूर तिच्या लावण्याचे घालतात सादा

परत साद देण्यासाठी, शीळ येऊ पाहे ओठी
पलीकडे खेड्यामाजी वसे एक राधा

स्वप्‍नभारल्या एकांती, तिचा हात यावा हाती
झणी भेटवी रे मित्रा राधिका मुकुंदा

Leave a Comment

x