फिटनेस टिप्स । Fitness Tips In Marathi । Part 6 – ३० मिनिटे चालण्याचे फायदे

३० मिनिटे चालण्याचे फायदे

(Benefits Of Walk In Marathi )

दररोज सकाळी ३० मिनिटे घराच्या बाहेर चालायला जावे .याने चालण्याचा व्यायाम होईल.

१. सहज सोपा सर्वाना शक्य होईल असा हा व्यायाम .

२. कोणत्याही साहित्या शिवाय करता येणारा व्यायाम .

३. शरीर तंदुरूस्त आणि चपळ ठेवण्याचा एकमेव व्यायाम प्रकार .

४. सकाळी चालण्यामुळे शुद्ध वातावरणातील ऑक्सीजनचा शरीराला पुरवठा होतो .

५. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते .

७. सतत काम करून आलेला थकवा नाहीशा होतो .

८. चालण्यामुळे चिडचिडेपणा, तणाव दूर होतो .

९. चालण्यामुळे झोपही चांगली लागते .

१०. वजन कमी करण्याचा किंवा वजन संतुलित ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे .

११. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळले जाते .

१२. चालण्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते .

१३. मन एकाग्र आणि चिंतनेसाठी चालणे फायदेशीर ठरते .

१४. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मलबद्धतेसारखे पचनाचे विकार दूर होतात .

१५.  झपझप चालण्याने हृदयाची गती आणि शक्ती वाढते .

१६. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये हृदय विकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते .

१७. दररोज चालणारयांची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते .

१८. नियमित चालण्यामुळे पाठीचे रोग हृदय रोग,उच्च रक्तदाब,श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते .

१९. नियमित चालण्यामुळे मांड्या,कंबर,पायाचे स्नायु मजबूत होतात .

२०. मोतीबिंदुची शक्यता कमी होते .

२१.  रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते .

२२. दररोज ३० मिनिटे चालण्याने सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते .

२३. नैराष्याची पातळी खाली येण्यास मदत होते .

२४. नियमित चालणे हि दिर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे .

२५. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते .

२६. एकंदरीत चालण्याने खूप सारे फायदे होतात .

Leave a Comment