Best Get Well Soon Message In Marathi | Get Well Soon Message for Friend, Love, Family In Marathi

Best Get Well Soon Message In Marathi: एखाद्याच्या वाईटात वाईट बनणे आणि एखाद्याच्या चांगल्यामध्ये चांगले बनणे, हे जगात नेहमीच घडत आले आहे, परंतु जेव्हा एखाद्याचा शत्रू जरी आजारी असतो, तेव्हा एक चांगल्या विचारांचा व्यक्ती नेहमी तो आजारी व्यक्ती लवकर बरा होण्याची इच्छा करतो. पूर्वी लोकांची दिनचर्या अशी असायची की लोक खूप कमी आजारी पडायचे, पण आता लोक आपले आरोग्य विसरून आपल्या गरजा पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. ( Best Get Well Soon quotes In Marathi )

जेव्हा एखादी व्यक्ती हॉस्पिटलच्या पलंगावर असते तेव्हा त्याला त्याच्या तब्येतीची काळजी वाटू लागते, मग तो फळे खाण्याबद्दल बोलतो, व्यायामाचा विचार करतो आणि मग घरी परत आल्यावर तो पूर्वी जे करत असे ते करू लागतो. ही चूक त्याला आजारी बनवते व परत आजारी पडते मग तो आपला धीर गमावू लागतो, त्याला त्याचा मृत्यू दिसू लागतो, परंतु अशा परिस्थितीत, जर त्याला कोणी थोडे प्रोत्साहन दिले, त्याला आशा दिली तर त्याला जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

आपले कोणीही नातेवाईक निरोगी नसले तर आपण खूप अस्वस्थ होतो, परंतु आपण प्रार्थना आणि शुभेच्छा यांशिवाय काहीही करू शकत नाही, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Get Well Soon In Marathi For Friend, Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend, Get Well Soon Message In Marathi For Girlfriend, Funny Get Well Soon Sms In Marathi For Sister तसेच Wishes For Good Health In Marathi वर लेख घेऊन आलो आहोत जेणे करून तुम्ही आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकता.

Get Well Soon Meaning In Marathi

मित्रांनो Get Well Soon हे एक इंग्लिश Phrase ज्याचा अर्थ असतो कि एखाद्या व्यक्तीला लवकर बरे होण्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करणे:

Get Well Soon In Marathi For Friend | मित्रासाठी गेट वेल सून संदेश

Get Well Soon In Marathi For Friend
Get Well Soon In Marathi For Friend

मनात आणलं तर या जगात
अशक्य असं काहीच नाही
आणि तुला आपली मैत्री
जपण्यासाठी लवकर बरं व्हावंच लागेल.
लवकर बरी हो.

प्रिय मित्रा,
तुझ्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
लवकर बरा हो आणि कट्ट्यावर भेट.

आजारी असल्यामुळे तुझ्या मनात
नकारात्मक विचार येत असतील.
पण असे अजिबात करू नकोस.
मनात सकारात्मक विचार आणलेस तर
नक्की लवकर बरी होशील.
Get Well Soon 🙏 🙏

आजारातून लवकरात लवकर बाहेर यावे
यासाठी माझ्या सदिच्छा कायम तुझ्याबरोबर आहेत

मी माझे सर्व सकारात्मक विचार
तुझ्याकडे पाठवत आहे.
तू लवकर बरा व्हावा
अशी प्रार्थना करत आहे.

तू कधीच का समजून घेत नाहीस रे…
मला तुझ्याशिवाय करमतच नाही.
लवकर बरा हो रे. मी वाट पाहतेय तुझी

Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend | बॉयफ्रेंडसाठी गेट वेल सून कोट्स

Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend
Get Well Soon Quotes In Marathi For Boyfriend

आपल्याला प्रेम करण्यासाठी
संपूर्ण जगाची आवश्यकता नाही.
एकच व्यक्ती खूप आहे आणि
माझ्यासाठी ती व्यक्ती तू आहेस.
तू असा आजारी अजिबातच
चांगला वाटत नाहीस. लवकर बरा हो!

आता तू आजारी आहेस आणि
माझं मन अजिबात थाऱ्यावर नाही.
जेव्हा तू बरा होशील आणि
मला भेटशील तेव्हा मला एक वचन हवं आहे.
याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी
तूच मला हवा आहेस. लवकर बरा हो!

मी देवाकडे रोज हेच मागते आहे की,
मला माझ्यासाठी अजून काही नको.
फक्त तुला लवकर बरे वाटू दे.
तूच माझं सर्वस्व आहेस.

प्रेम आणि मैत्री ही उत्तम उपचारपद्धत आहे.
तू लवकर बरा हो मला अजून काही नको

माझं प्रेम कायम तुझ्याबरोबर आहे तुला माहीत आहेच.
तू लवकर बरा होऊन माझ्याजवळ यावंसं हीच एक सदिच्छा!

तू जगातील माझा सर्वात जवळचा व्यक्ती आहेस
णि हे तुला माहीत आहे.
प्लीज लवकरात लवकर बरा हो!
Get Well Soon My Sweetheart

तू हसलास तर सर्व जग माझ्याबरोबर आहेस.
तू असा आजारी अजिबात चांगला वाटत नाहीस.
लवकर बरा हो रे! मी तुझी मनापासून वाट पाहतेय.

तुझ्यासाठी जगातील
सर्व आनंद मला आणायचा आहे.
तू लवकर बरा हो आणि
मला येऊन भेट हीच सदिच्छा आहे

प्रत्येकवेळी तुला पाहिल्यावर
मी अधिक प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील
सर्वात प्रिय व्यक्तीने
असे आजारी राहू नये हीच सदिच्छा.
लवकरात लवकर बरा हो!

Get Well Soon Message In Marathi For Girlfriend | गर्लफ्रेंडसाठी गेट वेल सून मेसेजेस

Get Well Soon Message In Marathi For Girlfriend
Get Well Soon Message In Marathi For Girlfriend

माझा विश्वास आहे की, तू लवकरच बरी होशील
आणि अगदी पूर्वीसारखी ठणठणीत होऊन
लवकरच मला प्रेमाने पुन्हा एकदा त्रास देशील.
LOVE you. Get well Soon 🙏 🙏

मला तुझी खूपच आठवण येत आहे.
लवकरात लवकर बरी हो!

थोडासा विश्वास आणि आत्मविश्वास ठेव.
तू लवकरच बरी होशील हा माझा पूर्ण विश्वास आहे.
सर्व काही ठीक होईल

लवकरात लवकर तू बरी व्हावीस
म्हणून खूप प्रेम आणि काळजी
तुझ्याकडे पाठवत आहे.
मी तुझी वाट पाहतोय,
त्यामुळे पटकन बरी हो!

चांगल्या मैत्रीची साथ मिळायला भाग्य लागतं
आणि ते मला तुझ्या रूपात मिळालं आहे.
तू असं आजारी राहून अजिबातच चालणार नाही.
लवकरात लवकर बरी हो
कारण मला तुला घट्ट मिठी मारून सांगायचं आहे की,
तू माझ्यासाठी किती खास आहेस.

तुझ्याशिवाय काही चांगलं वाटत नाही.
तू लवकर बरी हो आणि मला भेटायला ये.
तुझ्याशिवाय अन्नही गोड लागत नाहीये.
तू लवकर बरी व्हावीस हीच सदिच्छा!
Get Well Soon My Jaan 🙏 🙏

माझे प्रेम आणि काळजी नेहमीच तुझ्यासह आहे.
औषधं तर तू घेतच आहेस पण
त्याचबरोबर माझे प्रेमही तुझ्याबरोबर आहे.
तू लवकरात लवकर बरी हो आणि पुन्हा एकदा
त्याच जोमाने मला भेटायला
लवकरात लवकर ये..वाट पाहतोय.
तुझाच…

कायम सकारात्मक विचार ठेव
आणि लवकर बरी हो.
तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही तुला माहीत आहे.
माझ्या सदिच्छा कायम तुझ्याच बरोबर आहेत.
Get Well Soon Dear 🙏 🙏

लवकरात लवकर
तुझ्या तब्बेतीमध्ये सुधारणा व्हावी
हीच देवाजवळ सतत प्रार्थना करत आहे.
तुझ्याशिवाय दिवस रात्र काहीच चांगलं वाटत नाहीये.
लवकर बरी हो गं! तुझी वाट पाहतोय.

Funny Get Well Soon Sms In Marathi For Sister | बहिणीसाठी लवकर बरे व्हा विनोदी संदेश

Funny Get Well Soon Sms In Marathi For Sister
Funny Get Well Soon Sms In Marathi For Sister

मी तुझ्यासाठी खूप चॉकलेट्स आणली आहेत.
पण तुझ्या डॉक्टरांनी मनाई केली आहे.
त्यामुळे लवकर बरी होऊन ती खाणार आहेस
की मी संपवू ते मला सांग

कोणतीही औषधं तुझा बकवास
चेहरा बदलू शकणार नाही.
त्यामुळे उगीच हॉस्पिटलमध्ये पडून राहू नकोस.
चल लवकर घरी ये!

आपल्या गरीब डॉक्टर्सना
पैसे मिळाले फक्त तुला बरं नसल्यामुळे.
पण आता बरी हो लवकर!
जास्त पैसे राहिले नाहीत माझ्याकडे

सध्या आजारी असल्यामुळे
सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडेच केंद्रित होतंय
आणि ते मला अजिबात आवडत नाहीये.
त्यामुळे लवकर बरी हो!

लवकर बरी हो आणि परत ये
आणि आता तुला हॉस्पिटलच्या
जेवणाची चव कशी वाटली
तेआम्हाला सगळ्यानाच जाणून घ्यायचं आहे.
म्हणजे किमान आता घरच्या जेवणाला
नावं तरी ठेवणार नाहीस.

तू अशी पडून राहिलेली
अजिबात चांगली दिसत नाहीस.
चल पटकन बरी हो आणि
माझ्यासाठी काही मस्त खायला बनव

सगळ्यात जास्त तुला जर काही माहीत असेल
तर आजारी पडणं – मजा करतोय लवकर बरी हो!

तू लवकरात लवकर बरी व्हावीस
हीच इच्छा कारण मला
परत परत हॉस्पिटलमध्ये यायची
अजिबात इच्छा नाहीये

डॉक्टरांनी सांगितलं आहे की,
तुला सध्या सॉफ्ट डाएटवर राहायचं आहे
आणि यात माझाच जास्त फायदा आहे.
तरी पण तू लवकर बरी हो

Wishes For Good Health In Marathi | लवकर बरे व्हा शुभेच्छा संदेश

Wishes For Good Health In Marathi
Wishes For Good Health In Marathi

लवकरात लवकर बरे व्हा
आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगले
आणि निरोगी राहा हीच सदिच्छा!

तुमच्या निरोगी आणि यशस्वी
आयुष्यासाठी माझ्याकडून सदिच्छा!
लवकर बरे व्हा!

देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहोत.
लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा हीच एक इच्छा

अजिबात काळजी करू नका.
आपल्याकडील सकारात्मक
विचारांनी लवकर बरे व्हा!

आजारपणावर तुम्ही सकारात्मक विचारांनी करा मात.
आमची तुम्हाला आहे कायमची साथ! लवकर बरे व्हा!

आजारपण हे काही टिकणारे नक्कीच नाही.
तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा आणि लवकर बरे व्हा!

तुम्ही लवकरात लवकर
हॉस्पिटलमधून घरी यावे हीच सदिच्छा!

तुम्ही बरे व्हाल कारण मला माहीत आहे
आजारपण तुमच्या सामर्थ्याने व इच्छाशक्तीसमोर हरले आहे,
लवकरच बरे व्हा आणि बळकट व्हा

सर्व काही लवकरच ठीक होईल.
तुम्ही बरे होण्याची आम्ही
सर्व आतुरतेने वाट पहात आहोत.

तुम्हाला कधीच नसावे आजारीपण,
तुमच्याशिवाय घराला नाही घरपण!
लवकर बरे व्हा!🙏

लवकर बरे होऊन घरी या!

Get well soon from corona message in marathi

Get well soon from corona message in marathi
Get well soon from corona message in marathi

या सर्व कठीण परिस्थितीत
माझी सर्व प्रार्थना आणि
सकारात्मक विचार, प्रेम, काळजी
सर्वकाही तुमच्याबरोबर आहे.
लवकरात लवकर बरी व्हा बाबा!

या सर्व कठीण परिस्थितीत माझ्या
सर्व प्रार्थना आणि आशादायक विचार
तुमच्या बरोबर आहेत.
लवकर बरे व्हा!
Get well soon 🙏

हा रोग कितीही धोकादायक असला
हे काही फरक पडत नाही,
शेवटी मला माहित आहे,
आपल्या त्याच मोहक चेहऱ्यावरील
स्मितासह परत येणार.
Get well soon! 🙏

तू आजारी पडली आहेस
तर घर एकदम शांत झालंय.
घराची शांती भंग करण्यासाठी
लवकर बरी हो आई!

तू आजारी आहेस पण
मी तुला भेटायला येऊ शकत नाही
याचेच मला वाईट वाटत आहे.
पण तुला माहीत आहे माझे प्रेम
आणि मी दोन्ही तुझ्याजवळच आहोत.
खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!

तू आजारी आहेस हे कळलं.
मी इतक्या लांब असल्यामुळे
हतबल वाटत आहे.
पण माझ्या सदिच्छा तुझ्यासह आहेत
आणि तू लवकरच बरा होशील
अशी मी प्रार्थना रोज करत आहे.

आशा आहे की तुम्हाला हे Best Get Well Soon Message In Marathi खूप आवडले असतील. तुम्ही हे सर्वोत्कृष्ट Marathi get well soon quotes तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवू शकता. तब्बेत ठीक होण्यासाठीच्या या कविता वाचून तुम्हाला स्वतःबद्दल तर चांगलेच वाटेल, पण जे आजारी आहेत त्यांना देखील वाचून आनंद होईल. असेच आणखी लेख, कोट्स आणि कविता वाचण्यासाठी marathilekh.com या आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून सांगा, आम्ही तुमच्या शंकांचं लवकरात लवकर निरसन करू.

Get Well Soon In Marathi चे हे मेसेज तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Get well soon messages for friends

 

Leave a Comment