अभ्यास करायला मन लागत नसेल तर हे वाचा | Best Powerful Study Motivation in Marathi

लोक म्हणतात की सकाळची वेळ ही अभ्यासासाठी सगळ्यात चांगली असते, पण खर तर हे आहे की जर मन लावून अभ्यास केला तर कुठली ही वेळ असो मग ती सकाळ असो किंवा संध्याकाळ अभ्यास खूप चांगल्या रित्या होऊ शकतो. जो मनुष्य संकल्प सोबत घेऊन जगतो त्या व्यक्तीचे त्याच्या मनावर आणि मेंदूवर नियंत्रण असते.

अभ्यासाला बसलो की टेबलावर ठेवलेल्या 10 वस्तूंकडे लक्ष वेधून मन तुमचे विचलित होत असेल. मोबाईल देखील स्वतः नाही म्हणत की मला वापरा, तुमचे मन सांगते की मोबाईल वापर. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या भटकणाऱ्या मनाला नियंत्रित करायचे असेल तर मी सांगतोय ती गोष्ट लक्ष देऊन ऐकाल ती पुढे कामी येईल.

छोटे छोटे संकल्प करायला शिका, आज असे ठरवा की 1 तास मी माझ्या मोबाईलला हात लावणार नाही, जेव्हा अभ्यास करायला बसाल त्यावेळी मनात संकल्प करा की काहीही होऊ दे परंतु कमीत कमी 15 मिनिट मी माझी नजर पुस्तकातुन बाहेर काढणार नाही. हळू हळू अशा कामांची प्रॅक्टिस करत रहा, जेव्हा तुम्ही अशा छोट्या छोट्या संकल्पना पूर्ण करत जाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. तुम्हाला हा आत्मविश्वास येईल की तुम्ही ही गोष्ट करू शकता तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकताय. तुमचे हेच विचार तुमच्या मनाच्या भटकंतीला लगाम घालतील.

कधी पर्यंत त्या गोष्टींना आपल्या जीवनातून काढत राहा ज्या तुमचे लक्ष विचलित करत असतात? हेच योग्य राहील की तुमच्या मनाला इतके मजबूत बनवा की कोणतीही गोष्ट तुमचे लक्ष विचलित करूच शकणार नाही. ते म्हणतात ना की रस्त्यातून दगड उचलून फेकण्यापेक्षा चपला वापरणे जास्त सोयीचे असते. कोणीतरी काय छान म्हणले आहे की मृत्यू तर सर्वांना येतो परंतु जगणे कोणालाही जमत नाही.

बघा तुमच्याकडे आज संधी आहे तुमची लाईफ सेटकरायची, आणि हीच संधी पुढे येणाऱ्या काळात तुमच्याकडे राहणार नाही. जर आजही तुम्हाला अभ्यास करणे बोरिंग (कंटाळवाणे) वाटत असेल तर तुम्हाला आज पर्यंत हेच कळाले नाहीये की तुम्ही अभ्यास का करत आहात.

अभ्यास हा कंटाळवाणा असतो, खरे आहे! खरच अभ्यास करणे हे कंटाळवाणे काम आहे कारण यात काही मजा नाहीये, काही मनोरंजन नाहीये आणि काहिच नाहीये. परंतु झोपणे हे देखील कंटाळवाणे आहे ना? यात कोणते मनोरंजन? कोणती मजा असते? जेवण करणे देखील बोरिंग च असते! परंतू जेव्हा झोप येते तेव्हा झोपावेच लागते, भूक लागते तेव्हा खावे लागते, तेव्हा मनोरंजन आणि मजा या सर्व गोष्टी काही महत्वाच्या नाहीत. कारण यांची गरज नाहीये, गरज आहे ती झोप घेण्याची, गरज आहे ती खाण्याची!

याचप्रमाणे अभ्यास करणे देखील गरजेचे आहे मग तिथे मनोरंजन आणि मजा मिळत नाही या गोष्टींना काही महत्व नाही. अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजे आहेच! कारण जर तुम्ही आज तुमचे भविष्य बनवले तर पुढे जाऊन तुम्ही तुमच्या मनाला वाटेल ती कामे करू शकता. परंतु जर मजेच्या आणि मनोरंजनाच्या नादाला लागून तुम्ही आत्ता काहीच नाही केले तर जीवनात पुढे जाऊन तुम्हाला ते काम करावे लागतील जे तुम्हाला करायची मुळीच इच्छा नसेल.

कोणत्या एका अशा व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागेल ज्याला तुम्ही कधीच पसंत केले नाही, त्याचे बोलणे खावे लागतील आणि कदाचित त्याचा गुलाम देखील बनावे लागेल. तेव्हा कसे वाटेल? विचार करा… कसे वाटेल जेव्हा कोणीतरी तुमच्या आत्मसन्मानाला पायाखाली तुडवत असेल?  कसे वाटेल जेव्हा तुमच्या मुलांकडे खेळण्यासाठी चांगले खेळणं नसेल किव्हा जेव्हा लोक तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला इज्जत देणार नाहीत?

मित्रा, विचार कर एकतर पुढे जाऊन कवडीमोलाचे जीवन जग किंवा आत्ता मेहनत घेऊन पुढील आयुष्य सुधार! असेही होऊ शकते की मी बोललेल्या गोष्टी कदाचित तुम्हाला वाईट वाटत असतील परंतु गोड बोलणे हे माझे काम नाहीये, जर माझ्या या कडू बोलण्याने तुमचे जीवन हे योग्य मार्गावर येत असेल तर याहून चांगली कोणती गोष्ट नाहीये. वेळ आहे समजून घ्या नाहीतर येणारी वेळ तुम्हाला समजावून सांगणारच आहे.

तर विद्याथीमित्रांनो हीच ती वेळ आहे, आजपासून च मन लावून अभ्यास करायला सुरवात करा. आज नाही तर कधी च नाही.

मला अशा आहे कि Best Powerful Study Motivation in Marathi चा आमच्या हा लेख वाचून तुम्हाला अभ्यास करायला प्रेरणा भेटली असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment