भावविकल ओठावर | Bhaav-vikal Othavar Marathi Lyrics

भावविकल ओठावर | Bhaav-vikal Othavar Marathi Lyrics

गीत – वंदना विटणकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – उषा अत्रे-वाघ ,  सुधीर फडके


Bhaav-vikal Othavar Marathi Lyrics

भावविकल ओठावर शब्द मूक जाहले
आर्त धुंद गीतांतिल सूर सूर संपले !

नवरंगी चित्र एक मोहरले लोचनांत
आली बहरून रम्य प्रीतीची चांदरात
त्या फुलल्या पुनवेचे बिंब कुठे लोपले ?

श्वासांनी रेखियली स्वप्‍नबावरी कथा
गंधाने थरथरली मुग्ध लाजरी लता
त्या गंधित बहराचे विश्व आज भंगले !

जळणार्‍या हृदयाला समजावू सांग कसे ?
मिटवू मी सांग सखे फुलले फूल असे ?
अपुले ते गूज अतां आसवांत साठले !

Leave a Comment

x