भारतातील जलविद्युत प्रकल्प | Bhartatil Jalvidyut Prakalp 2025

भारतातील जलविद्युत प्रकल्प | Bhartatil Jalvidyut Prakalp 2025

आपल्या भारतात अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत, ज्यांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. आजच्या या लेखात मी तुमच्या साठी भारतातीतील प्रमुख जलविद्युत प्रकल्पासंबंधी महत्वाची माहिती घेऊन आलो आहे.

(१) मुचकुंदी प्रकल्प: मुचकुंदी नदीवरील आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपूत येथे मुचकुंदी नदीवर धरण, मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

(२) भाक्रा-नानगल : पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प, सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ‘भाक्रा’ व पंजाबमध्ये ‘नानगल’ अशी दोन धरणे, भारताची सर्वांत मोठी बहुउद्देशीय योजना.

(३) बिबास प्रकल्प: पंजाब, हरियाणा व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प, यामध्ये बियास-सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.

(४) श्रीशैलम प्रकल्प: सध्या तेलंगणा व आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांना फायदा. कृष्णा नदीवर धरण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती. विभाजनपूर्व आंध्र प्रदेश राज्याचा प्रकल्प.

(५) दामोदर खोरे योजना: पश्चिम बंगाल व विभाजनपूर्व बिहारमधील संयुक्त बहुउद्देशीय योजना, जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण इत्यादी उद्देश. या प्रकल्पामध्ये दामोदर नदीवर तिलय्या, मैथोन, पंचेत (सर्व झारखंड), दुर्गापूर (पश्चिम बंगाल) अशी अनेक धरणे बांधली आहेत. या प्रकल्पाचे व्यवस्थापन ‘दामोदर खोरे महामंडळ’ (Damodar Valley Corporation) मार्फत केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘टेनेसी व्हॅली’ च्या धर्तीवर रचना.

(६) फराक्का योजना: ही योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनेअंतर्गत गंगा नदीवर ‘फराक्का’ येथे व भागीरथी नदींवर ‘जांगीपूर’ येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे, हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

(७) चंबळ योजना: ही मध्य प्रदेश व राजस्थान सरकारची संयुक्त योजना असून या योजनेअंतर्गत राजस्थानात चंबळ नदीवर चुलिया धबधब्याजवळ ‘राणाप्रतापसागर’ व कोटा येथे ‘जवाहरसागर’ अशी दोन धरणे व मध्य प्रदेशात चौरासीगढ येथे ‘गांधीसागर’ हे धरण बांधण्यात आले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.

(८) हिराकूड प्रकल्प : हा प्रकल्प ओडिशा राज्यात आहे. ‘संबळपूर ‘जवळ महानदीवर जगातील सर्वांत जास्त लांबीचे धरण बांधले आहे. धरणाची लांबी सुमारे २५.८ कि. मी. इतकी आहे.

Hirakud Dam
Hirakud Dam

 

(९) उकाई प्रकल्प: तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुउद्देशीय प्रकल्प.

(१०) कोसी प्रकल्प: विभाजनपूर्व बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त योजना. या प्रकल्पामध्ये कोसी नदीवर दोन धरणे बांधण्यात आली आहेत. बहुउद्देशीय योजना.

(११) गंडक योजना: भारत व नेपाळ यांमधील संयुक्त योजना. गंडकी नदीवर ‘वाल्मिकीनगर’ येथे धरण. या योजनेचा फायदा बिहार, उत्तराखंड व उत्तर प्रदेश या भारतातील राज्यांना व नेपाळला होतो. जलसिंचन व बीजनिर्मिती हे उद्देश.

(१२) नागार्जुनसागर : तेलंगाणा व आंध्र प्रदेश या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. कृष्णा नदीवर ‘नंदीकोंडा’ येथे (हैदराबादपासून १५० कि. मी. अंतरावर) धरण.

(१३) तुंगभद्रा प्रकल्प: आंध्र प्रदेश व कर्नाटक सरकारची उक्त योजना. यामध्ये तुंगभद्रा नदीवर ‘मल्लामपुरम’ येथे धरण बांधण्यात आले आहे.

(१४) काक्रापारा: गुजरात राज्यात सुरत जिल्ह्यात ‘काक्रापारा’ येथे तापी नदीवर धरण.

(१५) भद्रा प्रकल्प: भद्रा नदीवरील कर्नाटक राज्यातील बहुउद्देशीय योजना.

(१६) तवा प्रकल्प: मध्य प्रदेशात ‘होशंगाबाद’ जिल्ह्यात तवा नदीवर (नर्मदेची उपनदी) धरण.

(१७) मही प्रकल्प: मही नदीवर गुजरात राज्यात ‘वनाकबोरी’ व ‘कडाणा’ येथे धरणे.

(१८) अप्पर कृष्णा प्रकल्प: या प्रकल्पामध्ये कर्नाटक राज्यात ‘नारायणपूर’ व ‘अलमट्टी’ येथे कृष्णा नदीवर दोन धरणे बांधण्यात आली आहेत.

(१९) पूर्णा प्रकल्प: पूर्णा नदीवर महाराष्ट्रात दोन धरणे.

(२०) टेहरी प्रकल्प: सध्याच्या उत्तराखंड राज्यातील गढवाल परिसरात ‘भागीरथी’ (गंगा) नदीवरील महत्त्वाकांक्षी बहुउद्देशीय योजना, रशियन तंत्रज्ञांच्या मदतीने विकास. ज्या प्रदेशात या प्रकल्पाखालील धरणे बांधली जात आहेत, तो प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या अस्थिर असल्याचे काही तज्ज्ञांचे मत. पर्यावरणदृष्ट्या प्रकल्प विवादास्पद.

(२१) घटप्रभा प्रकल्प: घटप्रभा नदीवर कर्नाटक हज्यात ‘बेळगावी’ व ‘विजापुरा’ जिल्ह्यांत धरणे.

(२२) रिहांद प्रकल्प: उत्तर प्रदेशात ‘सोनभद्र’ जिल्ह्यात धरण. वीजनिर्मिती व जलसिंचन हे प्रमुख उद्देश.

(२३) कोयना प्रकल्प: महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ ‘शिवाजीसागर’ हे धरण, वीजनिर्मिती हा प्रमुख उद्देश. मुंबई, पुणे व परिसरास
वीजपुरवठा.

(२४) मयूराक्षी योजना: मयूराक्षी नदीवरील प्रकल्प. पश्चिम बंगाल राज्यात. झारखंड व पश्चिम बंगाल या राज्यांना लाभ.

(२५) पेरियार प्रकल्प: पेरियार नदीवर, केरळ व तमिळनाडू या राज्यांना फायदा,

(२६) शरावती योजना: शरावती नदी. कर्नाटक राज्यात ‘लिंगनमक्की’ खेड्याजवळ धरण, कर्नाटक व गोव्याला लाभ.

(२७) कृष्णराजसागर: कावेरी नदी. कर्नाटक राज्यात. मुख्य उद्देश जलसिंचन.

(२८) पैकारा योजना: पैकारा नदी. तमिळनाडू, केरळ व कर्नाटक या राज्यांना लाभ.

(२९) मेट्टर योजना: कावेरी नदी. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांना लाभ.

(३०) नर्मदा प्रकल्प: गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. गुजरात राज्यात नर्मदा आणि तिच्या उपनद्यांवर ‘सरदार सरोवर’ हे १,२१० मीटर लांबीचे व १६३ मीटर उंचीचे धरण, मध्य प्रदेश राज्यात इंदिरा सागर (नर्मदा सागर) हे ६५३ मीटर लांबीचे व ९२ मीटर उंचीचे दुसरे मोठे धरण, जगातील मोठ्या जलप्रकल्पांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या या प्रकल्पांतर्गत ३० मोठ्या, १३५ मध्यम व ३,००० छोट्या धरणांचा समावेश आहे. देशातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प. अपेक्षित खर्च बारा हजार कोटी रुपयांहून अधिक. पर्यावरणदृष्ट्या विवादास्पद प्रकल्प. ‘नर्मदा बचाव’ आंदोलनामुळे प्रकाशझोतात.

(३१) साबरमती प्रकल्प: गुजरात राज्यात साबरमती नदीवर दोन धरणे, एक मेहसाणा जिल्ह्यात धारी खेड्याजवळ, तर दुसरे अहमदाबादजवळ वासना येथे. प्रमुख उद्देश जलसिंचन.

(३२) जायकवाडी प्रकल्प: गोदावरी नदीवरील या प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्रातील औरंगाबाद व शेजारच्या जिल्ह्यांना होणार आहे. यात पैठण येथील नाथसागर जलाशयाचा व माजलगाव येथील मातीच्या धरणाचा अंतर्भाव होतो.

जायकवाडी प्रकल्प
जायकवाडी प्रकल्प

(३३) कुकडी प्रकल्प: महाराष्ट्रात कुकडी नदीवर माणिकडोह, डिंभे, येडगाव, वडज व पिंपळगाव-जोगा येथे पाच स्वतंत्र धरणे. मुख्य उद्देश जलसिंचन.

(३४) करजन प्रकल्प: गुजरात राज्यात भरुच जिल्ह्यात जितगड गावाजवळ करजन नदीवर धरण. मुख्य उद्देश जलसिंचन.

(३५) पनाम प्रकल्प: गुजरात राज्यात पंचमहल जिल्ह्यात केलडेझार खेड्याजवळ पनाम नदीवर धरण, जलसिंचन हा प्रमुख उद्देश.

(३६) बार्गी प्रकल्प: मध्य प्रदेशात जबलपूर जिल्ह्यात बार्गी नदीवर धरण. बहुउद्देशीय प्रकल्प.

(३७) महानदी प्रकल्प: महानदीवरील मध्य प्रदेशातील प्रचंड मोठा प्रकल्प. यामध्ये रविशंकरसागर जलाशयाचा व पैरी धरणाचा समावेश होतो. रविशंकरसागर जलाशयातून भिलाई पोलाद प्रकल्पास पाणीपुरवठा केला जातो. तथापि, जलसिंचन हेच या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

(३८) कृष्णा प्रकल्प: महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर धोम येथे, तर वारणा या कृष्णेच्या उपनदीवर कन्हेर येथे अशी दोन धरणे. प्रमुख उद्देश जलसिंचन.

(३९) रामगंगा प्रकल्प: सध्याच्या उत्तराखंड राज्यात गढवाल प्रदेशात रामगंगा या गंगेच्या उपनदीवर धरण, पूरनियंत्रण व जलसिंचन हे उद्देश. दिल्ली शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.

(४०) इंदिरा गांधी कालवा: पूर्वी हा कालवा ‘राजस्थान कालवा’ या नावाने ओळखला जात असे. सन १९८५ मध्ये या कालव्यास स्वर्गीय इंदिराजींचे नाव देण्यात आले. यामध्ये ‘पोंग’ धरणातून सोडलेल्या पाण्याचा उपयोग करून राजस्थानातील विशेषतः थरच्या वाळवंटातील जमीन भिजविली जात आहे. हा संपूर्ण कालवा ६४९ कि. मी. लांबीचा असून त्यापैकी ४४५ कि. मी. लाबीचा कालवा हा राजस्थानमध्ये मोडतो.

(४१) मलप्रभा प्रकल्प: मलप्रभा नदीवरील कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील प्रकल्प.

(४२) पोचमपड प्रकल्प: तेलंगाणा राज्यात गोदावरी नदीवरील प्रकल्प. मुख्य उद्देश जलसिंचन.

हे देखील वाचा

स्पर्धा परीक्षा विज्ञान प्रश्न उत्तरे

Leave a Comment