भाऊबीजेला आला माझा | Bhaubeejela Aala Maza Marathi Lyrics

भाऊबीजेला आला माझा | Bhaubeejela Aala Maza Marathi Lyrics

गीत –  दत्ता डावजेकर
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – लता मंगेशकर


भाऊबीजेला आला माझा भाऊ घरीं

अंगासी सुगंधी उटणें लावू
भाऊरायाला न्हाऊं घालू
पहाटेच्या मंगल वेळीं शोभा न्यारी

चंदनी पाट, वरी चांदीचे ताट
रांगोळीची नक्षी दाट
संगती सुगंधी थाट
आनंदे चाखू दे बाई मेजवानीची माधुरी

चंद्र बिजेचा गगनी आला
दीप कुळाचा भाऊ सजला
ओवाळाया आनंदाने मी ग, त्याला
माझ्या ग आरतींत देई मोतीयांच्या सरी

Leave a Comment

x