बिनभिंतीची उघडी शाळा | Binbhintichi Uaghadi Shala Marathi Lyrics

बिनभिंतीची उघडी शाळा | Binbhintichi Uaghadi Shala Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – चिमण्यांची शाळा


Binbhintichi Uaghadi Shala Marathi Lyrics

बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे यांशी गोष्टी करू

बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू

सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिनपायांचे बेडकिचे लेकरू

कसा जोंधळा रानी रुजतो ? उंदीरमामा कोठे निजतो ?
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करु

Leave a Comment

x