बोलून प्रेमबोल तू लाविलास | Bolun Prembol Tu Lavilas Marathi Lyrics

बोलून प्रेमबोल तू लाविलास | Bolun Prembol Tu Lavilas Marathi Lyrics

गीत – गंगाधर महांबरे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – सुमन कल्याणपूर


बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
लावून छंद वेडा केलेस विश्व धुंद

धुंदित त्या क्षणांच्या युग एक हे बुडाले
घरटे करोनि चिमणे मन-पाखरू उडाले
वार्‍यावरी वरात, पथ हा तया अरुंद

प्रीतीत रंगलेली विरली उषा प्रभाती
छंदात हरवल्या त्या मधुपुनव-चांदराती
निशिगंध मात्र देई मन-भाबडा सुगंध

Leave a Comment