उन्हाळ्यात त्वचेसाठीची काळजी | Skin Care In Summer In Marathi

उन्हाळ्यात त्वचेसाठीची काळजी | Skin Care In Summer In Marathi

 

१. उन्हातून फिरून घरी आल्यानंतर लिंबाचा रस ,गुलाब पाणी आणि काकडीचा रस यांचे मिश्रण त्वचेवर लावावे .

२. लिंबाच्या रसामुळे उन्हाळ्यात काळी पडलेली त्वचा उजळ होते .

३. गुलाब पाणी आणि काकडीच्या रसामुळे त्वचेला थंडावा मिळतो .

४. मध आणि लिंबाचा रस लावूनही काळवंडलेली त्वचा उजळ करता येते .

५. कच्चे दूध ,हळद पावडर ,लिंबाचा रस एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावावी .

६. ताकामध्ये ओट भिजवून त्वचेवर लावावे .

७. ओट त्वचेतील धूळ स्वच्छ करते .

८. बेसन पीठ ,लिंबाचा रस आणि थोडेसे दही एकत्र करून उन्हाने काळवंडलेल्या त्वचेवर लावल्याने फायदा होतो .

९. चेहऱ्यावर नारळ पाणी लावल्याने त्वचा उजळते .

१०. कोरफडीचा गरही उन्हाळ्यात फायदेशीर ठरतो .

११. थंड पाण्यात गुलाब पाण्याचे थेंब टाकून त्याने अंघोळ करावी .

१२. घरातून बाहेर जाताना त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लावा .

१३. त्वचा झाकली जाईल असे फिकट रंगाचे कपडे घाला .

१४. घरचे ताजे लोणी त्वचेवर चोळावे .

१५. चेहऱ्यावर डाग दब्बे येऊ नये ,यासाठी घराबाहेर पडताना स्कार्फ बांधावा .

१६. चेहऱ्यावर पुरळ आलेल्यांनी त्वचा कोरडी ठेवावी .

१७. त्वचेसाठी भरपूर पाणी प्यावे .

१८. काकडीचे काप डोळ्यावर ठेवावेत .

१९. पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे खावीत .

२०. चांगल्या कंपन्यांचे सन ग्लासेस वापरावेत .

Leave a Comment

x