चाल बैला चाल | Chaal Baila Chaal Marathi Lyrics

चाल बैला चाल | Chaal Baila Chaal Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – कुबेराचं धन


Chaal Baila Chaal Marathi Lyrics

चाल बैला चाल
गीत गाती रानपाखरं घुंगुर देती ताल

पहाट फुटता औतं जुपली, सकाळ आली आणिक गेली
बघताबघता दुपार निवली,
गार वारा मावळतीचा सुखवी संध्याकाल

घटका येती घटका जाती, तुला मला ते काय माहिती
राबे त्याला लाभे शेती,
घाम गाळुनी सुगी साधता सुरू आपले साल

नंदी तू तर दूत शिवाचा, खांदां घेसी भार भवाचा
वंश थोर रे जगात तुमचा
गीता गातां कृष्ण स्वत:ला म्हणुन म्हणे गोपाल

Leave a Comment

x