चला सख्यांनो हलक्या | Chala Sakhyanno Halakya Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – ललिता फडके
चित्रपट – मायाबाजार
Chala Sakhyanno Halakya Marathi Lyrics
चला सख्यांनो, हलक्या हाते नखानखांवर रंग भरा
ग, नखांनखांवर रंग भरा
आज सांवलीपरी जायचे त्यांच्यामागे पाऊल ग
पायीं पैंजण बांधा द्याया आगमनाची चाहुल ग
सिंहकटीवर स्वैर खेळु द्या रत्नमेखला सैल जरा
बाहूंवरती बांधा बाई बाहुभुषणे नागाची
अंचलि झाका हृदयावरची कमळे ही अनुरागाची
गळ्यांत घाला हार साजिरा, पदकीं त्याच्या दिव्य हिरा
वेणी गुंफा मदनबाण, वर भवती हिरवा मरवा ग
आकाशातिल नक्षत्रांसम माथी मोती जडवा ग
सौभाग्याच्या नगरा नेते सौंदर्याचा थाट पुरा