चंदनाचे परिमळ | Chandanache Parima Marathi Lyrics

चंदनाचे परिमळ | Chandanache Parimal Marathi Lyrics

रचना -विश्वनाथ जोगळेकर
संगीत -अनिल मोहिले
स्वर – शरद जांभेकर

चंदनाचे परिमळ अम्हां काय त्याचें ।
तुझे नाम गोड किती घेऊं आम्ही वाचे ॥१॥
अम्हां काय त्याचें चंद्र-सूर्य प्रकाशतां ।
होई काया शुद्ध-स्वच्छ तुझे नाम घेतां ॥२॥
कटेवरी घेऊनी कर उभा तोची राहे ।
दास ह्मणे जातां शरण हरि वाट पाहे ॥३॥

Leave a Comment