चिमण्या पांखरांचे चिमणे ग | Chimnya Pakharanche Chimne Ga Marathi Lyrics

चिमण्या पांखरांचे चिमणे ग | Chimnya Pakharanche Chimne Ga Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले
चित्रपट – चिमणी पाखरं


चिमण्या पांखरांचे चिमणे ग घरकुल
चिमणे पंख मऊ, चिमणी ग किलबिल !

कालच्या वादळाची नाही ग आठवण
उद्याची नाही चिंता नाही ग साठवण
हालत्या फांदीवरीं डोलती वंशवेल !

आभाळ वर निळे विशाल खाली जग
झाडांच्या मनोर्‍यांत चिमणे लोभ-राग
प्रहार करू जाता वाराही थरारेल !

पाखरं आभाळाची, आधार धरणीचा
देखावा मनोहर देवाच्या करणीचा
वेगाने धावताना काळ उडुनि जाईल !

Leave a Comment

x