चुकचुकली पाल एक | Chukchukli Paal Ek Marathi Lyrics

चुकचुकली पाल एक | Chukchukli Paal Ek Marathi Lyrics

गीत – वसंत निनावे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – लता मंगेशकर


चुकचुकली पाल एक कालचक्र क्षण चुकले
नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले

रंग तुझे स्वप्‍नमयी ल्यालेली ती पहाट
धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट
परि दिशेस पुन्हापुन्हा वळण नवे का फुटले

अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी
इथे तिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी
गीतांतील सूर असे का मधेच पण तुटले

तुजवाचून दूरदूर मी अशीच राहणार
ही अशीच तव छाया पण मागे धावणार
सावल्यांत सार्‍या या चित्र असे मम कुठले

Leave a Comment

x