दाटे कंठ लागे | Daate Kanth Lage Marathi Lyrics
रचना – संत तुकाराम
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – पं. भीमसेन जोशी
दाटे कंठ लागे डोळियां पाझर ।
गुणाची अपार वृष्टी वरी ॥१॥
तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा ।
होऊनि निराळा पापपुण्यां ॥२॥
तुझ्या मोहें पडो मागील विसर ।
आलापें सुस्वर करिन कंठ ॥३॥
तुका ह्मणे येथें पाहिजे सौरस ।
तुह्मांविण रस गोड नव्हे ॥४॥