दे रे कान्हा चोळी | De Re Kanha Choli Marathi Lyrics
De Re Kanha Choli Marathi Lyrics: This is song is sung by Lata Mangeshkar, lyrics written by Jagdish Khebudkar, music composed by Ram Kadam. This Song is from Marathi Pinjara.
गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – पिंजरा
De Re Kanha Choli Marathi Lyrics
अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किस्नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी
ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिर्शिरी
गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी
नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन् लुगडी
बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती
अजून का तुज त्या खेळाच्या, छंदाची आवडी ?
ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती मदनाची लालडी ?
तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना शरणागत बापुडी !
हात जोडिता बंधन तुटले
अता जिवाला मीपण कुठले ?
आत्म्याने जणु परमात्म्याला अर्पण केली कुडी !
आम्हाला आशा आहे की तुम्हाला De Re Kanha Choli Marathi Song Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. दे रे कान्हा चोळी या गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.