देव आणि नास्तिक मनुष्य | Dev aani Nastik Manushya Marathi Katha
Dev aani Nastik Manushya Marathi Katha: एकदा एक नास्तिक मनुष्य देवाची खोडी करण्यासाठी त्याच्याकडे गेला. त्याने आपल्या हातात एक चिमणी लपवून ठेवली होती. तो देवाला म्हणाला, ‘हे देवा, माझ्या हातातली वस्तु जिवंत आहे की मृत ते सांग.’
देवाने जर जिवंत आहे असे सांगितले तर हातातल्या हातात मारून टाकावे व देवाला खोटे ठरवावे असे त्याने ठरविले होते. पण देवाने उत्तर दिले, ‘अरे तुझ्या हातातल्या वस्तूचं जीवन तुझ्यावर अवलंबून आहे. ती जर जिवंत रहावी असं तुला वाटलं तर ती जिवंत राहील, ती मरावी असं तुला वाटत असेल तर मरेल?
तात्पर्य :- देवापुढे लबाडी चालत नाही.
मित्रांनो तुम्हाला Dev aani Nastik Manushya Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.