धनगराची मेंढरं | Dhangarachi Mendhara Marathi Lyrics

धनगराची मेंढरं | Dhangarachi Mendhara Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – राम कदम
चित्रपट – मला तुमची म्हणा


Dhangarachi Mendhara Marathi Lyrics

धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं !
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

अवो साजिरी दिसत्यात
ही गोजिरवाणी हरणं
पर मानुस लई उफराटा
काळं त्याचं करणं
अवो त्याची भूक लई मोठी
त्याची दानत लई खोटी
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती !
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

आसं पुराणात लेकरु होतं
त्याचं सरावण बाळं
आंधळं आई-बाप बोललं
काशीला घेऊन चल
जलमदात्याची सेवा केली
दोघं दोन्हीकडं बसली
चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली, चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली !
आन्‌ खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

ऊन सोसवंना उतरला
बघुन एक झाड
आई-बा म्हणालं
घशाला पडली कोरड
भांडं घेऊन गेला फुडं
आलं पान्यामंदी बुडबुडं
तिथं घडु नये ते इपरित घडलं, तिथं घडु नये ते इपरित सारं घडलं !
आन्‌ बाण आला, घुसला गा काळजाच्या पातुर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

मोठी कथा हाय्‌ दुनियेला ठावं
सांगणारा सांगून गेला
उरलं त्याचं नाव
आता कलियुग आलं
जग उफराटं झालं
अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं, अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं !
आन्‌ मायेचा गा झरा गेला, आटलाया पाझर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

Leave a Comment

x