धनी तुमचा नि माझा | Dhani Tumcha Ni Maza Marathi Lyrics

धनी तुमचा नि माझा | Dhani Tumcha Ni Maza Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – वसंत पवार
स्वर – सुलोचना चव्हाण
चित्रपट – रंगल्या रात्री अशा


Dhani Tumcha Ni Maza Marathi Lyrics

तरुणपणाचं कौतुक म्हणुनी किती नटू मी किती नटू
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू

करा थाट तुम्ही सरदारी
अशी बशीन तुमच्या शेजारी
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू

राजा-राणीला चौकट कसली ?
मैना राघुच्या पिंजर्‍यात बसली
मैना गाईल गीत प्रीतिचे पोपट ‘विठू विठू’
धनी, तुमचा नि माझा एक काढा फोटू

Leave a Comment

x