धर धर धरा | Dhar Dhar Dhara Marathi Lyrics

धर धर धरा | Dhar Dhar Dhara Marathi Lyrics

गीत – चंद्रकांत खोत
संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – ललिता डावजेकर
चित्रपट – यशोदा


धर धर धरा धर धर धरा
चला ग घुमवू याला जरा गरगर गरा

ह्या आंधळ्यास द्या डोळा
हा सांब सदाशिव भोळा
मी मंतर मारिन काळा.. छू:

अंतर मंतर जंतर मंतर
आले मंतर कोले मंतर
झुम्मक झिय्या काजुच्या बिया
विठोबाचा विठुमियाँ.. छू:

विठुमियाँला या तर बाई
आवडतो पिंजरा
धर धर धरा

तू पकडशील रे ज्याला
तो देइल पेरु तुजला
मग होइल अस्सा खोकला
खोकला खोकला, बक्कन खोकला
टाकळा टाकळा – किनई भाजीत टाकळा
पापडात पापड – पोह्याचे पापड
विठोबाचा आजा माकड
फडफडवी रे तू तर आता पंख आपुले जरा
धर धर धरा

तू गर फेकुनि बी खाशी
जगावेगळी रीत अशी
दांडीवरती डुलकी घेशी

डुल डुल डुलकी वार्‍याच्या झुळकी
चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी
कावळ्या कावळ्या काव काव
आंधळ्या आंधळ्या धाव धाव
पळा पळा रे हा तर आला घुम्मत घुम्मत भोवरा
धर धर धरा

Leave a Comment

x