दो दिसांच्या संगतीची | Do Disanchya Sangatichi Marathi Lyrics

दो दिसांच्या संगतीची | Do Disanchya Sangatichi Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – ललिता फडके
चित्रपट – मायाबाजार


Do Disanchya Sangatichi Marathi Lyrics

का असा गेलास तू ? ना बोलता ना सांगता
दो दिसांच्या संगतीची हीच का रे सांगता ?

भावमाला लोपल्या ओठिंच्या ओठींच का ?
फुलविली तू लाज गाली सुकविण्यासाठीच का ?
पुसुन गेल्या रंग-रेखा चित्र अपुरे रंगता

दूर व्हाया जवळ आली काय वेडी पाखरें ?
ये पुन्हा ये राजहंसा, पंखि जीवा झाक रे
हाक मारू मी कशी रे, गूज फुटते बोलता

ठाऊका ना ठाव कोठे, मार्ग नाही माहिती
शोध घ्याया अंतरीचे नेत्र माझे धावती
ये उदारा, राजसा रे, आसरा दे मागता

Leave a Comment

x