डोहाळे पुरवा | Dohale Purava Marathi Lyrics

डोहाळे पुरवा | Dohale Purava Marathi Lyrics

संगीत – दत्ता डावजेकर
स्वर – आशा भोसले ,  मालती पांडे ( बर्वे )


डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा
डोहाळे पुरवा..

झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा
डोहाळे पुरवा..

भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा
डोहाळे पुरवा..

वेणीमधे मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा
डोहाळे पुरवा..

पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवा
सासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवा

तिसर्‍या महिन्याला खण-नारळ अन् वोमी‌
कुणी गर्भवतीची चोर ओटी भरविली

महिन्यात सहाव्या थकलं ग पाऊल
सासर्‍यास लागंल कान्‍ह्याची चाहूल

पहिलीच खेप ही जाणवोनी मुळी देवा
लाजर्‍या वेलीला नकळत बहरही यावा

नववा भरुनिया मुलगीच ग व्हावी
व्हावी ती झाशीची राणी

नववा भरुनिया पुत्र पोटी यावा
भारती जवाहीर व्हावा

Leave a Comment