डोळे माझे त्यात तुझे | Dole Maze Tyaat Tuze Marathi Lyrics

डोळे माझे त्यात तुझे | Dole Maze Tyaat Tuze Marathi Lyrics

गीत – मधुसूदन कालेलकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके ,  सुमन कल्याणपूर
चित्रपट – लग्‍नाला जातो मी


Dole Maze Tyaat Tuze Marathi Lyrics

डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ?
ओठ माझे त्यात तुझे गीत कसे ?

चित्त माझे त्यात तुझी प्रीत कशी ?
वीज इथे, आग तिथे, सांग कशी ?
नीज माझी त्यात तुझे स्वप्‍न कसे ?

चाल माझी त्यात तुझा डौल कसा ?
स्पर्श तिथे, कंप इथे, सांग कसा ?
गाल माझे त्यात तुझे रंग कसे ?

चंद्र माझा त्यात तुझा डाग कसा ?
देह इथे, प्राण तिथे, सांग कसा ?
चाल माझी त्यात तुझे सूर कसे ?

श्वास माझा त्यात तुझी ओढ कशी ?
चोर तिथे, चोरी इथे, सांग कशी ?
वेध माझा त्यात तुझे तीर कसे ?

Leave a Comment

x