एक होता काऊ | Ek Hota Kau Marathi Lyrics
गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – संजीवनी खळे
एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
“मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ ”
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
“तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट ”
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
“तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस ”
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
“तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय ?”
एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
“मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव