एका पुस्तकाची आत्मकथा | Marathi Nibandh | मराठी निबंध

एक मोठ ग्रंथालय होत , तिथे अनेक लाखो पुस्तक होती, आणि त्यात मी मराठी पुस्तक ,अशी बरीच पुस्तक मराठीची होती त्या ग्रंथालयमध्ये पुस्तक वाचण्यासाठी बरीच मोठी जागा दिली होती . बरीच मुल माणसं आपल्या भाषेची व आवड़ी नावड़ी ची पुस्तके वाचत बसली होती . एक मुलगा आला , साध शर्ट – पैंट, पायात चपला , केसांचा एका बाजूला भांग विंचारलेला, तो मुलगा ग्रंथालयातल्या माणसाशी काहीतरी गुणगुणु लागला होता, मला खूप आनंद झाला कारण तो मुलगा त्या ग्रंथालयातल्या माणसाशी मराठी भाषेत बोलला मी मनात म्हणालों, म्हणजे हा मुलगा मराठीच आहे तो पुस्तक शोधन्यास लागला होता मी त्याला मोठ्या मोठ्याने हाका मारत होतो “अरे . . . . ये . . . . . बालका इकडे ये . . . . .
त्याने काही ऐकलीच नाही, आजूबाजूची पुस्तके मला खूप हसू लागली होती. तो मुलगा पुस्तक शोधत शोधत माझ्या जवळ येत होता अचानक त्याने चालण थांबवलं आणि एक पुस्तक काढलं, पण ते पुस्तकं पाहून माझं मन एकदम उदास झालं होत, कारण ते मराठी भाषेच पुस्तकं नसून ते दुसऱ्या भाषेचं पुस्तक होतं. चार वर्ष झाली मला कोणीच जवळ घेत नहूत . एका जागेत बसून माझ्या अवयवाचे तुकडे पडले होते त्या जागेत राहून माझा ‘श्वास’ अगदी कोंडला होता . माझ्या डोळ्यातुन पाणी येऊ लागलं होत पण ते दुसऱ्यांना कसं दिसणारं. अशाचवेळी एका बलवान मुलाने प्रवेश केला.अंगाने एकदम टापटीप,दोन्ही कानात रुद्राक्ष बाल्या ,कपाळाला भगवा टिळा, गळ्यात जाड रुद्राक्षाची माळ, तो ग्रंथालयात येताच मी डोळे पुसले. मी त्या मुलाला म्हणालो,
” ये रे ….ये…. माझ्या लेका.. ये.. मी तुझीच वाट बघत होतो अरे मला इकडून घेऊन जा रे खूप कंटाळा आला आहे रे मला इथे राहून…..”
‘तो मुलगा पुस्तकं शोधण्यास गुंग होता त्याला एक पुस्तकं दिसलं पण ते पुस्तकं खूप खालच्या थराला होतं म्हणून तो मुलगा ‘जय शिवराय’ बोलून तो खाली बसला ….। त्याने एक पुस्तकं काढलं पण त्याला ते आवडलं नाही, म्हणून त्याने आहे त्याच ठिकाणी ते पुस्तकं ठेवलं मी मनात म्हणालो “जय शिवराय म्हणजे ह्याला मराठी पुस्तकं हवं आहे” मी त्याला जोऱ्या जोऱ्यात हाका मारल्या पण त्याने काही लक्ष्य दिलं नाही तो मूलगा तिथून मागे फिरला बहुतेक त्याचा मुड ऑफ झाला असावा, त्याला हवं ते पुस्तक मिळालं नसेल म्हणून तो मागे फिरला तितक्यात मला एक युक्ती सुचली मी जर ह्या कपाटावरून उडी मारली तर ? मोठा आवाज येईल,पण माझे अवयव वेगवेगळे होतील …..माझे अवयव वेगळे झाले तरी चालतील पण माझा ‘मराठी’ ।
माणूस वेगळा होता कामा नये,मी जास्त विचार न करता कापाटावरून उडी मारली ‘धप्पपsssss ‘ असा आवाज आला , माझे अवयव पूर्णपणे वेगवेगळे झाले.त्या मुलाला धाप्प असा आवाज कानी पडताच तो जागच्या जागी थांबला आणि मागे वळून पाहिलं तो मागे फटाफट आपले पाऊल टाकत टाकत माझ्याकडे आला तो खाली बसला जय शिवराय जय शिवराय हे नामस्मरण त्याचा तोंडात चालूच होतं, त्याने मला उचलून घेतलं माझी वेगळी झालेली अवयव त्याने व्यवस्थित जोडले आणि मला बंद केलं. त्याच लक्ष पाहिलं माझ्या अवयवाकडे गेलं त्याचे डोळे मोठे झाले तितक्यात त्याने जोरात हाक मारली राजे……….. कारण माझ्या पहिल्या अवयवावर शिवाजी महाराज अस लिहलं होत त्या मुलाने ‘राजे राजे ‘ म्हणत म्हणत त्याने मला मस्तकाला लावलं सगळी पुस्तक माणसे मुले हि आमच्याकडे बघत होती त्याने मला मस्तकावरून काढताच तो मला वाचत बसला मला खुप आनंद होत होता, कारण मी त्याच्या अगदी जवळ होतो तो पुस्तक वाचता वाचता त्याने अचानक मला बंद केलं आणि त्या ग्रंथालयातल्या माणसाकडे गेला त्यांना तो म्हणाला “सर हे पुस्तक मला घरी घेऊन जायचं आहे तर मला हे पुस्तक मिळाले का” ? ते मला म्हणाले “होय मिळेल फक्त चार दिवस….., प्रथम नाव घरचा पता सांग”त्या मुलाने पत्ता सांगितला तो मला हातात उचलून घेऊन निघून गेला मी सर्व पुस्तकांना राम- राम केलं,

मी त्याच्या घराजवळ पोहचलो होतो त्याच्या घराच्या बाहेर शिवाजी महाराजांचा फोटो होता त्याने त्याच्या घराची बेल वाजवली “ट्रिंग ट्रिंग” दरवाजा उघडला गेला त्याच्या घराला रंग हा ‘भगवा’ होता समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती होती, तो मुलगा मला आत घेऊन गेला आणि त्याने आईला हाक मारली ‘ ऐ आई ‘ तितक्यात आई स्वयंपाक घरातून बाहेर आली तो आईच्या पाय पडला मी मनात म्हणालो, “हा मुलगा खूपच संस्कृत दिसतो” तो आईला म्हणाला “आई हे बघ महाराजांचं ‘पुस्तकं’ त्याची आई मला बघून खूप खुश झाली तो आई ला म्हणाला आई हे ‘पुस्तकं’ आज मी वाचणार त्याशिवाय आज मी जेवणार नाही मी मनात विचार केला गेले चार वर्ष आगोदर एक मुलगा आला होता त्याने पंधरा ते वीस मिनिट पुस्तकं वाचलं, आणि हा मुलगा म्हणतो आहे मी पुस्तकं वाचल्याशिवाय जेवणार नाही. त्याने एक छोटासा लाकडी टेबलावर मला ठेवलं, मी ‘जय शिवराय’ म्हणून पुस्तकं वाचण्यास सुरुवात केली , मी त्याच्या डोळ्यात बघत होतो कारण मला वाचताना त्याच्या डोळ्याची पापणी देखील हलत नव्हती. जस जस त्याच वाचून होत होतं, तस तस तो पान पलटत होता त्याच्या वाचण्यात सकाळ उलटून गेली होती त्यात निम्म पुस्तक वाचून झालं होत, पण त्याच अंग अचानक कापू लागलं होत, त्याचे डोळे मोठे झाले होते डोळयातून पाण्याचे थेंब माझ्या अंगावर पडत होते कारण तो महाराजांचा व महाराजांच्या मावळ्यांचा पराक्रम बघून त्याच अंगाच ‘रक्त’ सळसळू लागलं होत. रात्र झाली त्याच अर्ध्यापेक्षा जास्तच पुस्तकाची पान वाचून झाली होती मी विचार करू लागलो होतो, “ह्या मुलाला अजून भूक कशी लागली नाही”. हळू हळू त्याचं पूर्ण पुस्तक वाचून झालं त्याने मला बंद केलं व डोळे मिटून शिवरायांचं नामस्मरण करू लागला होता काही वेळा नंतर त्याने डोळे उघडून मला देवाच्या देव्हाऱ्यात ठेवलं. मला रुद्राक्षची माळ घातली आणि माझ्या पाया पडला मी मनात म्हणालो, मी मुलं बघितली पण ह्या मुलांसारखी नाही. शिव-भक्त हवा तो असाच.

तीन दिवसानंतर …….
मी मनात म्हणालो “आता पुन्हा ग्रंथालयात जाऊन बसायचं मग केव्हा कोणाशी भेट होईल हे सांगता येत नाही मला ह्या घरातून नाही जायचं आहे ” तो मुलगा आईच्या पाय पडला आणि माझ्या समोर आला तो माझ्या पाया पडला आणि असाच घराच्या बाहेर निघून गेला. मी मनात म्हणालो, माझी वेळ तर संपली आता मला ग्रंथालयात जायचं आहे मग मला न घेऊन जाता हा कुठे गेला ?
काही तासानंतर तो मुलगा घरी आला त्याला ‘आईने विचारलं’ “बाळा हे पुस्तकं ग्रंथालयमध्ये घेऊन जाणार होतास ना” ? तो मुलगा मला बघत म्हणाला, आई हे पुस्तकं ह्या घरातून कुठेही जाणार नाही मी ग्रंथालयामधे गेलो होतो त्यांच्याशी बोललो कि “मला ते पुस्तकं हवं आहे” तर ते म्हणाले “त्यांचे आम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील” . मी त्यांना पूर्ण पैसे दिले मी मनात म्हणालो “म्हणजे मी आता इथेच राहणार मला आता कसलाच त्रास नाही ” त्याने मला क्षणभर बघून मुजरा केला, त्याचा मित्र घरात आला तो त्याच्या सारखाच….. । दोघे कुठेतरी बाहेर जात होते असा माझा अंदाज …….
मी त्या मुलाला हाक मारली ….. अरे.. थांब…. पण मुलाला काही हाक ऐकायला गेली नाही मी माझी युक्ती लढवली मी जोरयात घरामध्ये ‘राजे’ अशी हाक मारली घरच्या चारी बाजूला राजे या नावाचा आवाज घुमला लागला होता, तो मुलगा आणि त्याचा मित्र जागीच थांबले, तो घरात आजूबाजूला बघु लागला होता मी त्याला हाक मारली मी त्या मुलाला म्हणालो ,आतापर्यंत मूल बघितली….पण तुमच्या सारखी नव्हे मी जेव्हा ग्रंथालयमध्ये होतो तेव्हा कोणीतरी सारखचं मला जवळ घेऊन फक्त उगडून बघायचं आणि जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट मला वाचत बसायचं त्या नंतर तो वैतागून मला बंद करून ठेवायचा खूप वाईट वाटलं त्या वेळी त्या नंतर तुमची आणि माझी गाठा भेट झाली तुम्ही मला घरी घेऊन आलात खुप छान वाटलं तूम्ही मला पाठावर बसवलं आणि वाचन करायला जवळ घेतलात.
तेव्हा मी मनात म्हणालों होतो,
“ ह …….. हा पण बहुतेक अर्धवट वाचणार ? पण नाही ……. तुझ्या वाचण्यात सकाळ उलठुन गेली सकाळची दुपार झाली अरे दुपारची रात्र झाली पाणी न पिता कंटाळा न करता भूक लागली असून त्यावर नियंत्रण ठेवता तूम्ही मला पूर्ण वाचलात पहिलाच मुलगा आहेस की त्याने मला पूर्ण वाचल त्यामुळे माझ्याकडून तुम्हांला मानाचा मुजरा

Puja Shinde
मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Related Articles

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan | Marathi Nibandh

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या...

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने...

गुरुपौर्णिमा | Guru Purnima Marathi Nibandh | मराठी निबंध

आषाढ सुद्धा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -

Latest Articles

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan | Marathi Nibandh

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या...

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने...

गुरुपौर्णिमा | Guru Purnima Marathi Nibandh | मराठी निबंध

आषाढ सुद्धा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,...

जागतिक महिला दिन | International Women Day Marathi Nibandh

पाहता पाहता अलीकडच्या दहा वर्षात हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रत्येक संघटनेला या दिवसाचे, या कार्यक्रमाचे महत्त्व पटले आहे. कोणत्यातरी...

Baldin Marathi Nibandh |Children Day in Marathi

14 व्या नोव्हेंबर प्रत्येक वर्षी भारतभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुक्त भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाइ नेहरू यांचे वाढदिवस त्या दिवशी येतो....