एकटी शिवारी गडे | Ekati Shivari Gade Marathi Lyrics

एकटी शिवारी गडे | Ekati Shivari Gade Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – आशा भोसले ,  बालकराम
चित्रपट – तू सुखी रहा


Ekati Shivari Gade Marathi Lyrics

एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा

दाटली ग सांज बाई, दिवस बुडाया आला
अंतरी कशाचा उजेड माझ्या झाला
का असा अचानक हा डोले ग जोंधळा

तुज रात्रंदिवस ओढ ज्याची भारी
धुंडीत तुला ती मळ्यात फिरे स्वारी
तो वसंत वेडा ग त्याची तू कोकिळा

लपंडाव का असा ? तोंड तरी पाहू दे
ना अशीच मनीची प्रीत तुझ्या गाऊ दे
होऊ दे गळ्यातील हा साद पुरा मोकळा

Leave a Comment

x