चेहऱ्यावर लावायचे घरगुती लेप | Face Packs For Glowing Skin In Marathi

चेहऱ्यावर लावायचे घरगुती लेप | Face Packs For Glowing Skin In Marathi

१. चेहऱ्यावर तेज येण्यासाठी वापरायचा बदाम आणि दुध यांचा घरगुती लेप : –

३-४ बदाम आणि थोड दूध घेऊन सकाळी एका वाटीत ठेवावे व रात्री त्यांची पेस्ट करावी व ती पेस्ट त्या भागावर लावावी ,सकाळी उतल्यावर ते थंड पाण्याने धुवावे चेहऱ्यावर तेज येते व काळे डाग कमी होतात .

कोरड्या त्वचेसाठी हा लेप दररोज तर तेलकट त्वचेसाठी आठवड्यातून दोनदा वापरावा .

२. २-३ चमचे मध आणि २-३ चमचे लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर त्याचा लेप लावून अर्धा तासाने धुतल्यास चेहऱ्यावर चमक, सतेजपणा आणि गोरेपणा येतो .

३. काकडीचा रस ,कलिंगडाचा रस २ चमचे ,दही १ चमचा आणि दूध पावडर १ चमचा एकत्र करून चेहऱ्यावर लावून १५ मिनिट ठेवल्यास चेहरा चमकतो ,मऊ होतो आणि काळे डाग कमी होतात .

४. 3-४ चमचे दुध ,२-३ चमचे लिंबाचा रस आणि थोड्या प्रमाणात हळद एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावून सुके पर्यत ठेवून चेहरा थंड पाण्याने धुतल्यावर चेहरा चमकतो व गोरा होतो .

५. १-२चमचे बेसन ,१चमचा लिंबाचा रस ,एक चमचा हळद आणि १ चमचा गुलाब पाणी हे सगळे एकत्र करण्यासाठी त्यानंतर त्याची पेस्ट तयार करून ते चेहऱ्यावर सुके पर्यत ठेऊन नंतर थंड पाण्याने धुतल्यास त्वचा कोमल ,मुलायम ,गोरी होती .

६. चमकदार त्वचेकरता हळद आणि ज्येष्ठमध पूड दुधात कालवून लावावी .

. बटाटा आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याची पेस्ट काळवंडलेल्या शरीराच्या भागावर लावावे व त्यामुळे तो काळवंडलेल्या कमी होतो .”

८. केसर आणि दुध या फेस पैक ला तुम्ही दररोज किंवा आठवडयातून २ वेळा लावू शकता. यामुळे तुमचा चेहरा गुलाबा सारखा टवटवीत होईल.

९. केसर, दुध आणि तेल – एका भांडयात केसर, गुलाब जल , दुध आणि ओलिव ओईल किंवा नारळाचे तेल मिक्स करा. याला स्क्रब सारख्या फेस पैक मुळे त्वचा गोरी होईल आणि त्वचा चमकते .

१०. केसर आणि चंदन पावडर -हा फेस पैक ऑयली स्किन असणाऱ्यांना फायदेशीर आहे. यामध्ये थोडे दुध मिक्स करा आणि ५ मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवा. पाहिजे तर तुम्ही यामध्ये थोडे मध मिसळू शकता.

११. मध ,ओटस व दही मिक्स करा आणि चेहऱ्यावर मसाज करून १० मिनिटे ठेवा .नंतर पाण्याने स्वच्छ करावे .

१२.अंड्याचा पांढरा भाग आणि दही मिक्स करावे ते चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावून वॉश करावे .

१३. टोमटो, मध आणि दह्याला मिक्स करून ते चेहऱ्यावर १५-२० मिनिटे ठेवावे .

Leave a Comment

x