गड्या रे प्रपंच हा | Gadya Re Prapanch Ha Marathi Lyrics

गड्या रे प्रपंच हा | Gadya Re Prapanch Ha Marathi Lyrics

गीत – राजा बढे
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – माझी आई


Gadya Re Prapanch Ha Marathi Lyrics

गड्या रे प्रपंच हा लटका
गुरफटता मायाजालि नाहि रे सुटका

कामिनी रूपसुंदरा
धनदौलत येई घरा
उदराचा भरशी दरा
कुरवंडी करशी काढून काळिज कुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

क्षणभंगुर सुख ओसरे
संसारी जीवन सरे
घडिघडी गळे, पाझरे
किति जपशिल वेड्या देह कटोरा फुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

तो दीनबंधू भूवरी
वैकुंठ करी पंढरी
आठवी सावळा हरी
हरिनाम करील भवपार, जिवाची सुटका
गड्या रे प्रपंच हा लटका

Leave a Comment

x