गमाडि गंमत जमाडि | Gammadi Gammat Jammadi Marathi Lyrics

गमाडि गंमत जमाडि | Gammadi Gammat Jammadi Marathi Lyrics

गीत – आशा गवाणकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – कुंदा बोकील


गमाडि गंमत जमाडि जंमत, ये ग ये सांगते कानात
बोलायचं नाहि पण, सांगायचं नाहि कुणी
हसायचं नाहि ग गालात

गच्चिवर चल, जिन्याखाली चल, चला ग जाऊ बागेत
मागिल दारी, पुढच्या दारी, इथंच सांगते कानात

पण बाई शप्पत, गळ्याची शप्पत, नाही कुणाला बोलायचं
खरंच सांगते, दिलं वचन ते, नाही कुणी ग मोडायचं

काय झालं बाई, किनई ग, बाई
इश्श ग बाई, बोलू कसं ?
आमची किनई, मनी किनई
बाई बाई सांगू कसं ?
दोन नी तीन, तीन नी दोन
पिटुकलि पिल्लं झाली तिला
अशि बाई, गंमत गमडि गंमत, चला गडे ग, बघा चला

Leave a Comment

x