गंध हा श्वास हा | Gandh Ha Shwas Ha Marathi Lyrics

गंध हा श्वास हा | Gandh Ha Shwas Ha Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – आराम हराम आहे


Gandh Ha Shwas Ha Marathi Lyrics

गंध हा, श्वास हा, स्पर्श हा सांगतो
तूच तो, तूच तो, तूच तो !

हे धुंद डोळे नशिले नशिले
मला वेड यांनिच रे लाविले
हे ओठ राजा रसिले रसिले
स्वप्‍नात रे मीच ओलावले
हे ओळखिचे तुझे हासणे
माझी मला खूण आता कळे
या मनी जो कुणी दिलरूबा छेडितो
तूच तो, तूच तो, तूच तो !

ये राजसा हा दुरावा कशाला
घडी मीलनाची उभी राहिली
या झिंगलेल्या गुलाबी निशेची
किती काळ रे वाट मी पाहिली
कितीही लपविले खरे रूप तू
मी जाणिले कोण आहेस तू
बहुरूपी जो कुणी खेळ हा खेळतो
तूच तो, तूच तो, तूच तो !

Leave a Comment

x