गांधी जयंती | Gandhi Jayanti Marathi Nibandh
Gandhi Jayanti Marathi Nibandh: जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या गांधीचा आज जन्म दिवस. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.
माहात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६१ साली गूजरात मधील पोरबंदर शहरात झाला. गांधीजीच्या वडिलांचे नाव करमचंद तर आइचे नाव पुतळाबाई होते. वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा कस्तुरबा माखनवाला यांच्याबरोबर बालविवाह झाला. शालेय शिक्षण संपवून वयाच्या १९व्या वर्षी १८८८ मध्ये गांधीजी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. गांधीजी आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली. हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास.
रवींद्रनाथ ठाकूर यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा ही उपाधि दिली. महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे महान आत्मा. लोक गांधीजीना बापूजी ही म्हणत. १९४४ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले. अंहिसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर १९१५ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण मधील शेताकऱ्यांना, जुलमी कर आणि जमिनदार यांच्याविरोधात एकत्र करुन लढा दिला. त्यांनतर गांधीजीनी दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वांवर आधिरित आंदोलांनी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. गांधीजीनी सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्व:त ती तत्वं जगले. स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कपड्यांना विरोध केला आणि खादीचा पुरस्कार केला. गांधीजी चरख्यावर स्वत: काढत असे.
३० जानेवारी १९४८ साली गांधीजींची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून फिरत असताना नथुराम गोडसे या युवकाने गांधीजींवर गोळ्या झाडल्या. आणि एका युगपुरूषाचा अंत झाला. गांधीजीं वर गोळ्या झाडणारा नथुराम हा पुरोगामी विचारसरणीचा हॊता. त्याचे संबधं जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. त्याचे मते पाकिस्तानला पैसे देऊन भारातला दुबळे बनविण्यास गांधीजींच जवाबदार होते. गांधीजींच्या राज घाट येथील समाधीवर ‘हे राम’ हे शब्द लिहलेले आहे. अनेकांच्या मते त्यांचे हे अखेरचे शब्द होते.
गांधी जयंती हा दिवस महात्मा गांधी प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा गांधी जयंती (Gandhi Jayanti Marathi Nibandh) आवडला असेल.
लक्ष द्या: जर तुमच्या कडे सुद्धा Gandhi Jayanti वर अशाच प्रकारे कोणता Marathi Essay असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा Gandhi Jayanti Marathi Nibandh आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.