General Knowledge Questions on History in Marathi
Q1. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?
A. चिनाब
B. सतलज
C. सिंधू
D. गंगा
स्पष्टीकरण
– हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली म्हणून तिला सिंधू संस्कृती म्हणतात.
– हडप्पा संस्कृती विषयी परीक्षाभिमुख
– सिंधू नदीच्या खोऱ्यात विकास.
- कांस्य धातू वापरायचे म्हणून कांस्य संस्कृती म्हणतात.
- हडप्पा येथे उत्खननात सापडली म्हणून हडप्पा संस्कृती असे म्हणतात.
- त्या लोकांना लिपीचे ज्ञान होते, पण ती लिपी वाचता आली नाही.
- येथे घोडा, सिंह हे प्राणी नव्हते.
- तेव्हा लोहाचा शोध लागला नव्हता.
- सिंधू संस्कृतीचा अंदाजे काळ इ.स.पूर्व 2500 वर्ष
- ही मातृसत्ताक संस्कृती होती.
- शोध दयाराम साहनी (1921)
Q2. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे ?
A. संगमपूर
B. पैठण
C. गंगापूर
D. कचनेर
स्पष्टीकरण
- छ. संभाजीनगर जिल्ह्यात कचनेर येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र आहे.
जैन धर्माबद्दल परीक्षाभिमुख माहिती
- 24 तीर्थकर होऊन गेले.
- 24 वे तीर्थंकर भगवान महावीर होते.
- धर्मग्रंथ आगम
- पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यातून त्यांनी शिकवण दिली.
Q3. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
A. ऋग्वेद
B. सामवेद
C. अथर्ववेद
D. यजुर्वेद
स्पष्टीकरण
- वैदिक काळात मंत्रांचे संकलन सामवेदात केले आहे.
- सामवेदात संगीताचा उल्लेख आहे त्यालाच भारतीय संगीताचा पाया मानले जाते.
- चार वेद आहेत.
हे लक्षात ठेवा
वेद माहिती
- ऋग्वेद: पहिला वेद, विविध शक्तींना देवता मानले
- यजुर्वेद: यज्ञाविषयी माहिती
- सामवेद: यज्ञाच्या वेळचे मंत्र, संगीताचा पाया.
- अथर्ववेद: शेवटचा वेद, जीवन कसे जगावे, आयुर्वेद याचाच एक भाग आहे.
Q4. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे?
A. हडप्पा
B. कालीबंगन
C. मोहेंजोदडो
D. दायमाबाद
स्पष्टीकरण
- मोहेंजोदडो (मृतांचा डोंगर) हे पाकिस्तानमधील सिंथ प्रांतातील गाव आहे.
- मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले.
- या स्नानगृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर आहे.
- कालीबंगन – राजस्थान
- दामयाबाद – अ. नगर (प्रवरा तीरावर)
Q5. छ. संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला?
A. यादव घराणे
C. चालुक्य घराणे
B. खिलजी घराणे
D. तुगलक घराणे
स्पष्टीकरण
- दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे.
Q6. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
A. अकोले
B. संगमनेर
C. राहता
D. नेवासा
स्पष्टीकरण
- जोर्वे संगमनेर तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातले गाव आहे.
- जोर्वे येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले.
- हे अवशेष इसवी सनपूर्व 150 चे आहेत. उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला ‘जोर्वे संस्कृती’ म्हणतात.
Q7. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत ?
1) अर्थमागथी
2) मागधी
3) पाली
4) यापैकी नाही
स्पष्टीकरण
- गौतमबुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देतांना पाली भाषा वापरत.
- तेव्हा सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी पाली ही सामान्यांची भाषा होती, त्यामुळे धर्मप्रचारास वाव मिळाला.
- पाली भाषेत शिकवण – बुद्ध – बौद्ध धर्म
- अर्थमागधी भाषेत शिकवण महावीर जैन धर्म
Q8. ‘रामचरित मानस’ या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली ?
1) सूरदास
2) तुलसीदास
3) कालिदास
4) वीरदास
स्पष्टीकरण
- रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती तुलसीदासाने केली.
- तुलसीदास है संस्कृत पंडित होते, परंतु अवधी बोलीभाषेत त्यांनी काव्यस्वरूपात रामायण लिहिले.
- कालिदासांनी कुमारसंभव, मेघदूत, शांकुतल ही नाटके लिहिली.
Q9. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
1) कुंती
2) माधुरी
3) गांधारी
4) हिडिंबा
स्पष्टीकरण
- धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी होते.
- धृतराष्ट्र हा शंभर कौरवांचा पिता होता, म्हणजेच पांडवांचा चुलता किंवा पांडूचा भाऊ होता.
- दुर्योधन हा धृतराष्ट्रचा सर्वात मोठा मुलगा होता.
- पांडूचे पाच पुत्र होते, त्यांना पांडव म्हणतात.
- कुंती ही पांडूची पत्नी म्हणजे पांडवांची आई होती, तसेच ती कर्णाची आई होती.
Q10. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ?
1) कुतुबुद्दीन
2) हसन गंगू
3) महमूद गवान
4) आदिल शहा
स्पष्टीकरण
- हसन गंगू म्हणजेच अल्लाउद्दीन हसन बहामनी याने बहामनी राज्याची स्थापना केली.
- बहामनी दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत होती.
Q11. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला?
1) अकबर
2) जहांगीर
3) शहाजहान
4) औरंगजेब
स्पष्टीकरण
- जहांगीर मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन झाला.
- पहिली वखार – सुरत येथे
Q12. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले?
1) बाबर व इब्राहम लोदी
2) मराठे व अब्दाली
3) अकबर व हेमू
4) बाबर व राणासंग
स्पष्टीकरण
- पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ 1526 साली अफगाण योद्धा बाबर व लोदीवंशीय इब्राहिम यांच्यामध्ये झालेली होती.
- या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोदी मारला गेला.
Q13. इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?
1) मोहम्मद तुघलक
2) अल्लाउद्दीन खिल्जी
3) सिकंदर लोदी
4) इब्राहिम लोदी
Also Read