घन बरसत बरसत आले | Ghan Barasat Barasat Aale Marathi Lyrics
गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – वीणा सहस्त्रबुद्धे
घन बरसत बरसत आले
वनि मोराचा षड्ज लागला
झाडांतुन मल्हार जागला
मन चकित, सुगंधित झाले
शिवधनुष्य कडकडले वरती
सुखावली आशेने धरती
खग तोरण धरित उडाले
सजल धुंद आनंद चहुंकडे
नभ रत्नांचे तृणात उघडे
वन निथळत अमृत न्हाले