घेई घेई माझे वाचे | Ghei Ghei Maze Vache Marathi Lyrics

घेई घेई माझे वाचे | Ghei Ghei Maze Vache Marathi Lyrics

Ghei Ghei Maze Vache Marathi Lyrics: This song is sung by Suman Kalyanpur, lyrics written by Sant Tukaram, music composed by Sudhir Phadke.

रचना  – संत तुकाराम
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुमन कल्याणपूर


Ghei Ghei Maze Vache Marathi Lyrics

घेई घेई माझे वाचे ।
गोड नाम विठोबाचें ॥१॥

तुह्मी घ्या रे डोळे सुख ।
पहा विठोबाचें मुख ॥२॥

तुह्मी ऐका रे कान ।
माझ्या विठोबाचें गुण ॥३॥

मना तेथें धांव घेई ।
राहें विठोबाचे पायीं ॥४॥

(रूपीं गुंतले लोचन ।
पायीं स्थिरावले मन ॥५॥

देहभाव हरपला ।
तुज पाहता विठ्ठला ॥६॥

तुका ह्मणे जीवा ।

नको सोडूं या केशवा ॥७॥

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Ghei Ghei Maze Vache Marathi Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. घेई घेई माझे वाचे या गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.

Leave a Comment

x